Indian vaccine withstand high temperatures vaccine effective against delta omicron corona sakal
देश

उष्ण तापमानातही टिकणार भारतीय लस!

डेल्टा, ओमिक्रॉन तसेच कोरोनाच्या इतर प्रकारांवर ही लस प्रभावी ठरू शकते

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोनावर प्रभावी ठरू शकणाऱ्या भारतीय लशीची उंदरांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे या लशीच्या साठवणुकीसाठी थंड हवामानाची गरज नाही. प्रतिपिंडे तयार करण्याची क्षमता असल्याने डेल्टा, ओमिक्रॉन तसेच कोरोनाच्या इतर प्रकारांवर ही लस प्रभावी ठरू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) आणि जैवतंत्रज्ञान कंपनी मायनव्हॅक्स यांनी करोना विषाणूच्या काटेरी कवचाच्या ‘रिसेप्टर बाईंडिग डोमेन’ (आरबीडी) या प्रथिनांच्या काही भागाचा या लशीसाठी उपयोग केला आहे. या प्रथिनांमुळे विषाणूला शरीरातील पेशींमध्ये शिरकाव करता येतो. या लशीच्या चाचण्या अजून सुरू आहेत.

लशीची चाचणी करणाऱ्या पथकात ऑस्ट्रेलियाच्या कॉमनवेल्थ सायंटिफिक अ‍ॅंड इंडस्ट्रिअल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या संशोधकांचा समावेश आहे. ही लस ३७ अंश सेल्सिअस तापमानात चार आठवडे टिकू शकते. इतकेच नव्हे तर १० अंश सेल्सिअस तापमानातही ही लस ९० मिनिटे टिकू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. ऑक्सफर्डने तयार केलेल्या अ‍ॅस्ट्राझेनेका, भारतातील कोविशिल्ड या लशींना दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात ठेवावे लागते. फायझरच्या लशीला उणे ७० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते.

प्रतिपिंड निर्मिती

वायरसेज या विज्ञानविषयक नियतकालिकात या लशीबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या लशीचे उंदरांवर प्रयोग करण्यात आले. त्यावेळी डेल्टा व ओमिक्रॉन या प्रकारांवरही ती प्रभावी असल्याचे दिसून आले. उंदरांच्या शरीरात प्रतिपिंडे (अँटिबॉडी) तयार झाली. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारक्षमता उंदरांच्या शरीरात निर्माण झाल्याचेही दिसून आले. या लशीच्या चाचण्या यशस्वी झाल्या तर उष्ण हवामान असलेल्या देशांत, तसेच लशीच्या साठवणुकीसाठी `कोल्ड चेन` तयार करू न शकणाऱ्या गरीब देशांमध्ये ही लस वापरता येऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT