देश

कोव्हॅक्सिनचे डोस घेणाऱ्या भारतीयांना परदेशात प्रवेश नाही ?

काय आहे कारण?

दीनानाथ परब

नवी दिल्ली: कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस (vaccine dose) घेतलेल्या नागरिकांना आपल्या देशात प्रवेश देण्यासंदर्भात जगातील अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास धोरण जाहीर केलं आहे. काही देश हे प्रवास धोरण जाहीर करण्याच्या टप्प्यामध्ये आहेत. भारतातील नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींचे डोस दिले जात आहेत. ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनचे (Covaxin_ दोन डोस घेतलेत, त्यांना सुरुवातीचे काही महिने आंतरराष्ट्रीय प्रवास (international travel) करता येणार नाही. (Indians global trips may be hit as Covaxin not on WHO vaccine list)

काय आहे कारण?

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जगातील सर्वच देश वेगाने लसीकरण करण्यावर भर देत आहेत. यामध्ये स्वदेशातील नियामक यंत्रणेने किंवा WHO च्या आपातकालीन वापराच्या यादीतील लसींना मान्यता दिली जात आहे. सिरमची कोव्हिशिल्ड, मॉडर्ना, फायझर, अस्त्राझेनेका, सिनोफार्मा/BBIP या लसींचा WHO च्या आपातकालीन वापराच्या यादीमध्ये समावेश आहे. पण कोव्हॅक्सिनचा या यादीत अद्याप समावेश झालेला नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

WHO च्या कागदपत्रांनुसार, कोव्हॅक्सिनने माहिती सादर केली आहे. पण त्यांच्याकडून आणखी माहिती मागवण्यात आली आहे. मे-जूनमध्ये कोव्हॅक्सिन संदर्भात बैठक होणार असल्याचे WHO कडून सांगण्यात आले आहे. एखादी लस आपातकालीन वापराच्या यादीत नसेल किंवा दुसऱ्या देशाने मान्यता दिली नसेल, तर प्रवाशाचे लसीकरण झालेले नाही असेच समजण्यात येते, असे इमिग्रेशन तज्ज्ञ विक्रम श्रॉफ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

SCROLL FOR NEXT