ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात सुमारे २८८ जण मृत्युमुखी पडले. शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात झालेल्या दुर्घटनेत ९०० हून अधिक जखमी झाले आहेत. देशातील सर्वात भीषण अपघातांपैकी एक अपघात म्हणून कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघाताकडे पाहिले जात आहे. देशात गेल्या पाच ते सहा दशकांत घडलेले अपघात.
२३ डिसेंबर १९६४ : रामेश्वरम येथे चक्रीवादळामुळे पामबन-धनुषकोडी पँसेजर रेल्वे वाहून गेली. त्यात १२६ जणांचा मृत्यू झाला.
६ जून १९८१: देशातील सर्वात भीषण अपघात बिहार राज्यात झाला. भरधाव रेल्वे बागमती नदीच्या पुलावरून कोसळली आणि त्यात ७५० हून अधिक जणांचा मृत्यू.
२० ऑगस्ट १९९५: उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे पुरुषोत्तम एक्स्प्रेस आणि कालिंदी एक्स्प्रेस यांच्यात धडक होऊन ३०५ जणांचा मृत्यू.
२ ऑगस्ट १९९९: कथियार विभागात ब्रह्मपुत्र मेल आणि अवध आसाम एक्स्प्रेस यांच्यात गैसाल रेल्वेस्थानकावर जवळ झालेल्या अपघातात २८५ हून अधिक प्रवासी मृत्युमुखी पडले. तसेच ३०० जण जखमी झाले. मृतांत लष्कर, सीमा सुरक्षा दल आणि सीआरपीएफमधील जवानांचा समावेश होता.
२६ नोव्हेंबर १९९८: पंजाबच्या खन्ना येथे फ्रंटियर गोल्डन टेम्पलच्या घसरलेल्या तीन डब्यांना भरधाव जम्मू तावी-सेल्दाह एक्स्प्रेसची धडक झाल्याने २१२ जणांचा मृत्यू
९ सप्टेंबर २००२: बिहारच्या रफिकगंज येथे धावे नदीवर रफिकगंज रेल्वे आणि हावडा राजधानी एक्स्प्रेस यांच्यात झालेल्या अपघातात १४० जणांचा मृत्यू. या अपघाताला दहशतवाद्यांच्या घातपाताला जबाबदार धरण्यात आले.
२८ मे २०१०: मुंबईकडे जाणाऱ्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसचे डबे पश्चिम बंगालच्या झारग्राम येथे घसरून मालगाडीला धडकल्याने झालेल्या अपघातात १४८ जणांचा मृत्यू.
२० नोव्हेंबर २०१६: कानपूरजवळील पुखरायन येथे इंदोर-राजेंद्र नगर एक्स्प्रेसचे डबे घसरून पुखरायन रेल्वेला धडकल्याने १५२ जणांचा मृत्यू. तसेच २६० जण जखमी झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.