देशातील जवळपास सर्वच ट्रेन्सच्या जनरल डब्यात आपल्याला खचाखच गर्दी पाहायला मिळते, पण फ्लाइटमध्ये अशी स्थिती कधी पाहायला मिळत नाही. पण जर विमानात देखील जर असाच प्रकार पाहायला मिळला तर कोणाचा विश्वास देखील बसणार नाही. पण असाच काहीसा प्रकार इंडिगोच्या एका फ्लाइटमध्ये पाहायला मिळाला आहे.
मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एका इंडिगो फ्लाइटमध्ये मंगळावारी हा प्रकार समोर आला. इंडिगोचे हे विमान ओव्हरबुक झाल्याने यामध्ये काही प्रवासी मागच्या बाजूला उभे राहिल्याचे दिसून आले. विशेष गोष्ट म्हणजे असे असताना फ्लाइटने टेकऑफ देखील केले होते. मात्र यानंतर फ्लाइट परत एअरपोर्टवर लँड करण्यात आली.
हिंदूस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ही घटना मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर घडली. सकाळी आठ वाजता मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये क्रू मेंबर्सना एक व्यक्ती एअरक्राफटच्या मागच्या बाजुला उभा असल्याचे दिसून आले. तेव्हा विमान उड्डाणच करणार होते.
क्रू मेंबरने प्रवासी उभा असल्याची माहिती पायलटला दिली, त्यानंतर फ्लाइट परत टर्मिनलवरती आणण्यात आली. मात्र अद्याप याबाबत एअरलाइन्सकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आले नाही.
या विमानातील एका प्रवाशाने सांगितले की, विमान टर्मिनलवर परत आल्यानंतर त्या व्यक्तीला उतरवण्यात आले. ते म्हणाले की विमान कंपनीकडून प्रत्येकाच्या केबिनचे सामान तपासले गेले आणि विमानाचे टेकऑफ सुमारे एक तास उशिराने झाले.
मात्र २०१६ मध्ये डीजीसीएमने जारी केलेल्या नियमांनुसार, जर विमान कंपनीने प्रवाशाला उड्डाण केल्यानंतर एक तासाच्या आत दुसरे विमान उपलब्ध करून दिले, तर प्रवाशाला कोणतीही भरपाई द्यावी लागत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.