Indira Gandhi|Suresh Gopi|Kerala Esakal
देश

Indira Gandhi: इंदिरा गांधी 'मदर इंडिया' तर काँग्रेस नेता गुरू, नुकतीच शपथ घेतलेल्या मंत्र्याच्या विधानामुळे भाजपमध्ये पेटणार वाद?

आशुतोष मसगौंडे

केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्र सरकारचे पर्यटन आणि पेट्रोलियम राज्यमंत्री सुरेश गोपी हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. दरम्यान नुकतीच त्यांनी पुनकुन्नम येथील करुणाकरन यांचे स्मारक 'मुरली मंदिरम'ला भेट दिली.

यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना 'मदर ऑफ इंडिया' म्हटले आहे. तर काँग्रेस नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री करुणाकरन यांचे 'राजकीय गुरू' म्हणूनही वर्णन केले आहे.

दरम्यान गोपी यांच्या या विधानांमुळे भाजपमध्ये अंतर्गत राजकारण पेटण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तूळात याबाबतची चर्चाही सुरू झाली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपच्या सुरेश गोपी यांनी करुणाकरन यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते के. मुरलीधरन यांचा पराभव केला होता.

त्रिशूर जागेवर झालेल्या तिरंगी लढतीत काँग्रेस नेते के. मुरलीधरन यांना पराभवासह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर करुणाकरन यांच्या स्मृतीस्थळी गेल्यानंतर केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी आपण येथे आपल्या गुरूंना आदरांजली वाहण्यासाठी येथे आलो असल्याचे सांगत आपल्या दौऱ्याचा राजकारणाशी संबंध जोडू नये, असे आवाहन माध्यमांना केले.

यावेळी सुरेश गोपी म्हणाले की, नयनार आणि त्यांच्या पत्नी शारदा टीचर यांच्याप्रमाणे करुणाकरन आणि त्यांची पत्नी कल्याणीकुट्टी अम्मा यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध होते.

सुरेश गोपी यांनी १२ जून रोजी कन्नूर येथील ईके नयनार यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यावेळी गोपी म्हणाले की, ते इंदिरा गांधींना 'मदर इंडिया' आणि के. करुणाकरन यांना 'केरळमधील काँग्रेस पक्षाचे जनक' मानतात.

यंदाच्या लोकसभा मतदारसंघात विजय मिळवून केरळमध्ये भाजपचे खाते उघडणारे सुरेश गोपी यांनी काँग्रेस आणि सीपीआयच्या उमेदवारांचा पराभव केला.

केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश गोपी यांना 4 लाख 12 हजार 338 मते मिळाली होती, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सीपीआयचे उमेदवार व्हीएस सुनीलकुमार यांना 3 लाख 37 हजार 652 मते मिळाली होती. अशाप्रकारे सुरेश गोपी यांनी भाकपच्या उमेदवाराचा ७४ हजार ६८६ मतांनी पराभव केला. तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार के मुरलीधरन 3 लाख 28 हजार 124 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT