डॉक्टरांच्या टीमने दोन तासांच्या सर्जरीनंतर मुलाच्या तोंडातून ३० दात काढले. या दातांचा आकार १ मिमी ते १० मिमी पर्यंत होता. तसेच. वरच्या जबड्यात ६ दात खोलवर दबले गेले होते, असे डॉक्टरांनी सांगितले.
आपल्या तोंडात सर्वसाधारपणे ३२ दात असतात. पण, मध्य प्रदेशातील इंदोरमधल्या एका १० वर्षाच्या मुलात चक्क ५० दात (Teeth) होते. तेथील डॉक्टरांनी या मुलाच्या तोंडात ५० दात असल्याचा दावा केला आहे. या मुलाच्या तोंडात सामान्यांपेक्षा ३० दात जास्त होते. त्यामुळे त्याचे तोंड सुजले होते. दोन तासांच्या सर्जरीनंतर मुलाच्या तोंडातून ३० अतिरिक्त दात काढले आहे. अशी समस्या १० हजारातून एका मुलाला येते, असे या मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी (Doctor) सांगितले. हा मुलगा आता पूर्णपणे बरा आहे.
असे झाले निदान
नयापुरा भागात राहणाऱ्या या मुलाचे (Kid) चार वर्षांपासून तोंड फुगलेले तसेच चेहऱ्यावर सूज असायची त्याच्या आईवडिलांनी अनेक डेन्टीस्टना दाखवले. पण फायदा झाला नाही. मग मुलाला घेऊन कुटूंब इंदोरला आले. तेथील डॉक्टरांनी मुलाचा एक्सरे काढला. सर्वसाधारणपणे मुलांच्या तोंडात २० दात असतात. पण या मुलाच्या तोंडात ३० दात जास्त असून त्याची वाढ झाली होती. त्यामुळे हिरड्या दबल्या होत्या, असे आढळले. म्हणूनच अशा हिरड्यांमुळे मुलाचे तोंड सुजले होते. जबड्यातून रक्तवाहिनी गेल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. शिरा कापल्यास तोंडाभोवतीचा भाग बधीर होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी मुलाला मोठ्या रुग्णालयात दाखवण्याचा सल्ला दिला.
दोन तासांचे ऑपरेशन
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुटूंबियांनी मुलाला मॉर्डन डेंटल कॉलेज एंड रिसर्च सेंटरमध्ये दाखवले. तिथे मुलाचा पुन्हा एक्सरे काढण्यात आला. तसेच काही चाचण्याही घेण्यात आल्या. साधरणपणे वरच्या आणि खालच्या बाजूला 10-10 दातांचा सेट असतो. पण, मुलाला 30 दात होते, असे डॉक्टरांच्या लक्षात आले .अशा स्थितीला वैद्यकीय भाषेत ओडोन्टोमा म्हणतात. याविषयी डॉक्टरांनी सांगितले की, असे दात हिरड्या आणि काही हाडांपर्यंत दबले जातात. त्यानंतर डॉक्टरांच्या टीमने दोन तासांच्या सर्जरीनंतर मुलाच्या तोंडातून ३० दात काढले. या दातांचा आकार १ मिमी ते १० मिमी पर्यंत होता. तसेच. वरच्या जबड्यात ६ दात खोलवर दबले गेले होते, असे डॉक्टरांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.