divorced women and fraud with husband in mp infdore 
देश

MP : बायकोनेच घातला गंडा, लग्नानंतर युरोपचा दौरा केला अन् ५० लाख घेऊन पळाली

एका मॅट्रिमोनिअल साइटवरून व्यावसायिकाचा महिलेशी संपर्क झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका व्यावसायिकाने एका घटस्फोटित महिलेसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांची ऑनलाईन एका वेबसाईटवर ओळख झाली होती. यानंतर त्यांनी लग्न केले आणि त्यानंतर दोघे युरोपला फिरायलाही गेले. मात्र परत आले असता त्या बायकोने भांडण करून व्यापारी नवऱ्याचे 50 लाखांचे दागिने घेऊन पळ काढला आहे. एका मॅट्रिमोनिअल साइटवरून व्यावसायिकाचा महिलेशी संपर्क झाला होता. पडित नवऱ्याने याची नोंद पोलिस स्थानकांत केली आहे. (divorced women and fraud with husband in mp infdore)

इंदूरच्या लासुदिया पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली असून व्यापाराची पत्नी घरातून 50 लाखांचे वडिलोपार्जित दागिने घेऊन फरार झाली आहे. तक्रारीत तो म्हणाला की, काही दिवसांपूर्वीच त्याने एका घटस्फोटित महिलेशी लग्न केले होते. तो स्वतः व्यापारी असून काही दिवस आधी त्याचा घटस्फोट झाला होता.

लग्नानंतर तीन महिन्यांनी दोघेही युरोपला फिरायला गेले होते. तेथून परतल्यानंतर काही दिवसांत त्याचे पत्नीशी भांडण झाले आणि ती बेपत्ता झाली. मात्र सध्या पत्नी फोनही उचलत नसून ती कुठे आहे याची कल्पनाही नाही अशी तक्रार व्यापाराने दिली आहे. पत्नीने ५० लाखांचे वडिलोपार्जित दागिनेही पळवून नेले आहेत. त्यामुळे या व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.

याप्रकरणी लासुडीया पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी गणेश सोळंकी यांनी सांगितले की, व्यावसायिकाची पत्नी ५० लाखांचे दागिने घेऊन फरार झाली आहे. दोघेही काही दिवसांपूर्वी परदेश दौरा करून आले आहेत. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. महिलेने तिच्या बहिणीसह shaadi.com वर संपर्क साधून इंदूरच्या एक व्यावसायिकाशी लग्न केले होते. महिला आणि व्यापारी दोघेही घटस्फोटित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT