Congress Marathi News Congress Marathi News
देश

Inflation : काँग्रेस ५ ऑगस्टला पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घालणार घेराव

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे (Inflation) काँग्रेस ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालतील. काँग्रेसने खासदार, आमदारांना गावात आणि छोट्या शहरात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले आहे. महागाईविरोधात राजधानीत काँग्रेसने (Congress) राजभवनावर घेराव घालण्याचे नियोजन केले आहे. आंदोलनादरम्यान राज्यातील आमदार, माजी खासदार आणि ज्येष्ठ नेत्यांना राजभवनाच्या घेरावात सहभागी होण्यास सांगितले आहे.

लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना ‘चलो राष्ट्रपती भवन’च्या नावाने महागाई (Inflation) आणि बेरोजगारीविरोधात आंदोलन करण्यास सांगितले आहे. नवी दिल्लीत पक्षाच्या वतीने पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा घेराव घालण्याची योजना आहे. निदर्शनादरम्यान काँग्रेस (Congress) कार्यकारिणीसह सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

सोमवारी लोकसभेत महागाईवर चर्चा होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन चर्चेला उत्तर देतील, अशी सूत्रांची माहिती आहे. विरोधी पक्ष अनेक दिवसांपासून महागाईवर चर्चेची मागणी करीत असताना ही बातमी आली आहे. त्यामुळे दोन आठवडे संसदेत सतत गदारोळ सुरू होता आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू नव्हते.

महागाईच्या मुद्द्यावरून झालेल्या चर्चेवरून झालेल्या गदारोळ आणि घोषणाबाजीमुळे विरोधी पक्षांच्या दीड डझनहून अधिक खासदारांचे निलंबनही झाले होते. विरोधी पक्षनेत्यांनी सदस्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत भाववाढीसह अन्य मुद्द्यांवरून संसदेचे कामकाज उधळून लावले.

किमती सातत्याने खाली येत आहेत - सरकार

सरकारच्या म्हणण्यानुसार, खाण्यापिण्याच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. कांदे, खाद्यतेल, वनस्पती तूप, टोमॅटो, चहा यासह विविध सामान्य जीवनावश्यक वस्तूंची सहा महिन्यांची आकडेवारी जाहीर करून सरकारने हा दावा केला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे खाद्यपदार्थांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने खाली येत आहेत, असे सरकारने सांगितले. २५ एप्रिलपासून पाम तेलाच्या किमती १० टक्क्यांनी कमी झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fire: मुंबईतील इंडस्ट्रियल इस्टेट परिसर स्फोटांच्या आवाजाने हादरला, आगीचा भयानक व्हिडिओ व्हायरल

Amravati Stone Pelting: अमरावतीत भयंकर प्रकार! पोलीस स्टेशनवरच हजारो लोकांकडून दगडफेक, 21 पोलीस जखमी

Latest Maharashtra News Updates: आमदार सतेज पाटील यांनी धरला ठेका

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

Today Navratri Colour: नवरात्रीचा चौथा रंग केशरी, 'या' मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून घ्या आउटफिट आयडिया, दिसाल सुंदर

SCROLL FOR NEXT