नवी दिल्ली : ग्राहकांना आता दैनंदिन वापराच्या उत्पादनांसाठी अधिक पैसे मोजावे (Inflation) लागतील. गहू, पाम तेल आणि पॅकेजिंग वस्तूंसारख्या (Packaging goods) वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे एफएमसीजी कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय रशिया-युक्रेन युद्धामुळे एफएमसीजी कंपन्यांनाही फटका बसला आहे. त्यामुळे गहू, खाद्यतेल आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होईल, असा अंदाज आहे. (Inflation will hit)
डाबर आणि पार्ले सारख्या कंपन्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. महागाईच्या दबावाला तोंड देण्यासाठी काळजीपूर्वक पावले उचलतील. हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्लेने गेल्या आठवड्यात त्यांच्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढवल्या आहेत, असे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. उद्योगाकडून किमतीत दहा ते १५ टक्के वाढ होण्याची आम्हाला अपेक्षा आहे, असे पार्ले प्रॉडक्ट्सचे वरिष्ठ श्रेणी प्रमुख मयंक शाह यांनी पीटीआयला सांगितले.
दरात कमालीची अस्थिरता आहे. अशा स्थितीत भाववाढ किती होईल हे सांगणे कठीण आहे. पाम तेलाची किंमत १८० रुपये प्रति लीटरवर (Inflation) गेली होती. आता ती १५० रुपये प्रति लीटरवर आली आहे. त्याचप्रमाणे प्रति बॅरल १४० डॉलरवर गेल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत शंभर डॉलरच्या खाली आली आहे, असेही मयंक शाह म्हणाले.
आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून
महागाई अजूनही उच्च पातळीवर आहे. सलग दुसऱ्या वर्षी ही चिंतेची बाब आहे. महागाईमुळे (Inflation) ग्राहकांनी खर्च कमी केला आहे. ते लहान पॅक खरेदी करत आहेत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि योग्य विचार केल्यानंतर उपाययोजना करू, असे डाबर इंडियाचे मुख्य वित्तीय अधिकारी अंकुश जैन म्हणाले.
किमती तीन ते पाच टक्क्यांनी वाढवतील
फएमसीजी कंपन्या (FMCG companies) महागाईचा बोजा ग्राहकांवर टाकत आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्ले यांच्याकडे किंमत जास्त ठेवण्याची ताकद आहे. कॉफी आणि पॅकेजिंग वस्तूंच्या दरवाढीचा बोजा ग्राहकांवर टाकत आहेत. २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत सर्व एफएमसीजी कंपन्या किमती तीन ते पाच टक्क्यांनी वाढवतील, असे एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेसचे कार्यकारी उपाध्यक्ष अबनीश रॉय म्हणाले.
पार्लेमध्ये सध्या पुरेसा साठा
किमती अजूनही पूर्वीपेक्षा जास्त आहेत. आता प्रत्येकजण दहा ते पंधरा टक्के वाढीबद्दल बोलत आहे. उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. पार्लेमध्ये सध्या पुरेसा साठा आहे. एक-दोन महिन्यांत दरवाढीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही मयंक शाह म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.