नवी दिल्ली : दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकारने १ लाख ४० हजार चिनी सीसीटीव्ही कॅमेर बसवले असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भारतात सध्या चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जावा यासाठी मोहीम सुरु आहे. केंद्र सरकारने ५९ चिनी अॅपवर बंदी आणल्यानंतर हा विरोध अजून तीव्र झाला आहे. यातच दिल्लीत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे चिनी कंपनी हिकव्हिजनने तयार केलेले असल्याने नवा वाद समोर आला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर चीनविरोधात देशभरात संताप आहे. यानंतर केजरीवाल सरकारविरोधात अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा वाद निर्माण केला आहे. दिल्लीतील हजारो लोकांनी या कंपनीचं अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड केलेलं असून यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. भाजपने या मुद्द्यावरुन आम आदमी पक्षाला टार्गेट केलं असून लवकरात लवकर ही चूक सुधारावी अशी मागणी केली आहे. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे सगळं राजकारण असल्याचं म्हटलं आहे.
-------------------
चिंताजनक ! कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाखांच्या वर
-------------------
सीसीटीव्ही हा एकमेव धोका नाही. पण जेव्हा लोक सीसीटीव्ही पाहण्यासाठी चिनी कंपनीचं अॅप डाउनलोड करतील तेव्हा मोठा धोका आहे, अशी माहिती सायबर सेक्युरिटी एक्स्पर्ट अनुज अग्रवाल यांनी इंडिया टुडेशी या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. हे अॅप चीनमधील कोणतीही कंपनी, सरकार किंवा लष्कराकडून हाताळलं जाऊ शकतं. अशा स्थितीत दिल्लीच्या रस्त्यांवर काय सुरु आहे याची माहिती त्यांना मिळत राहील. अशी घुसखोरी रोखण्यासाठी कोणतीही सुरक्षा फिचर्स यामध्ये नाहीत, असंही त्यांनी सांगितलं आहे.
कॅमेरे कधी लावले?
गतवर्षी जुलै महिन्यात दिल्ली सरकारने निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण कऱण्यासाठी राजधानीत सर्व रहिवाशी तसंच व्यवसायिक संकुलांमध्ये एकूण दीड लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा आदेश दिला होता.
आरोप काय आहे?
या कॅमेऱ्यांचे सर्व्हरदेखील चीनचं आहे. याच्या आधारे दिल्लीतील प्रत्येक जागेवर ते नजर ठेऊ शकतात. दिल्ली सरकारने चिनी कंपनीचे कॅमेरे का बसवले याचं उत्तर दिलं पाहिजे, असे भाजपनेते म्हणतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.