नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२४ चं अंतरिम बजेट आज लोकसभेत सादर केलं. या बजेटवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजच बजेट म्हणजे विकसित भारताची गॅरंटी असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच या बजेटसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो असंही त्यांनी म्हटलं आहे. (Interim budget 2024 a guarantee of developed India PM Modi praised Nirmala Sitharaman)
मोदी म्हणाले, "आजचं हे बजेट इनोव्हेटिव्ह आहे. यामध्ये सातत्याचा आत्मविश्वास आहे. हे बजेट विकसित भारताचे चार स्तंभ युवक, गरीब, महिला आणि शेतकरी यांना सशक्त करणारं आहे. निर्मला सितारामन यांचं हे बजेट देशाच्या भविष्याच्या निर्मितीचं बजेट आहे. या बजेटमध्ये २०४७ च्या विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची गॅरंटी आहे. मी निर्मला सितारामन आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो" (Latest Marathi News)
दरम्यान, बजेट मांडताना अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, "आपल्या गरीब, महिला, युवा, अन्नदाता या चार गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवं. या चार वर्गाच्या इच्छा-आकांशा यांना सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवं" (Marathi Tajya Batmya)
त्याचबरोबर विकसित भारताचं व्हिजन साकार करण्यासाठी राज्यात अनेक विकास आणि विकास सक्षम सुधारणांची गरज असल्याचंही सीतारामन यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारांद्वारे याच्याशी संबंधित सुधारणांना घडवून आणण्यासाठी 50 वर्षांच्या व्याजमुक्त कर्ज म्हणून 75,000 कोटी रुपयांची तरतूद यावर्षी प्रस्तावित आहे, असंही सीतारामन यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.