International Human Rights Day 2022 : मानवी हक्क दिन दरवर्षी 10 डिसेंबरला साजरा केला जातो, या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 1948 मध्ये, मानवी हक्कांची वैश्विक घोषणा (UDHR) स्वीकारली होती. UDHR मध्ये 30 आर्टिकल आहेत ज्यात मूलभूत मानवी हक्क आणि स्वातंत्र्यांचे विस्तृत ग्रेड सेट केले आहे.
मानवी हक्क हा नैसर्गिकरीत्या प्रत्येकाचा हक्क असला तरी प्रत्येकाला मिळतोच अस नाही. हुकुमशाही मिटवण्यासाठी या कायद्याची निर्मिती झाली पण प्रत्येकाला याचा उपभोग घेता येत नाही. समाजात आजही सेक्स वर्कर हा असा एक घटक आहे ज्याची साधी माणसात गणनाही होत नाही.
रेड लाईट एरिया मध्ये राहणाऱ्या बायकांना आजही समाजमान्यता नाही. गोमंतक समाजाच्या नायकिणींपासून याची सुरुवात झाल्याचे काही इतिहासकार म्हणतात. आज अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या इच्छा नसतानाही आपल्या उदरनिर्वाहासाठी हे काम करतात, तर काहींना फसवून इथे विकलं जातं.
खरतर भारतासह इतर काही देशांमध्ये सेक्स वर्क हे बेकायदेशीर नाहीये पण आजही त्यांच्याकडे तुच्छ नजरेनं बघितलं जातं. इथल्या बायकांना काहीही किंमत नसते, अनेकदा त्यांना काही झालं कोणी छेड काढली तर पोलिसांकडे गेल्यावर पोलिसही त्यांना धुकावून लावल्याची बातमी आपण ऐकली आहे. घरांमध्ये याविषयी चर्चा होत नाही.
इथे जन्मणाऱ्या मुलांना मानवी हक्कानुसार शिक्षणाचा हक्क आहे, पण त्यासाठीही त्यांना खूप लढावं लागतं. चांगलं शिक्षण, पाणी, समाजात थोडासा मान या गोष्टी सुद्धा या घटकाला मिळत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.