International Tea Day sakal
देश

International Tea Day : टपरीवरचा चहा एवढा फेमस का?

तुम्हाला माहिती आहे का टपरीवरचा चहा एवढा फेमस का?

निकिता जंगले

भारतात चहा प्रेमींची कमी नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चहा अतिशय प्रिय असतो. आपल्या देशात तर अगदी दिवसातून तीन चार वेळा चहा घेतला जातो. असं म्हणतात, इंग्रज येऊन गेले आणि चहाचं व्यसन देऊन गेले. मुळात त्यांच्या चहात आणि आपल्या चहात जमीन आसमानचा फरक म्हणावा...

चहा म्हटलं की सकाळी सकाळी घरी पेपर वाचताना गरमा-गरम हातात आलेला कप आठवतो तर कधी कट्ट्यावरचा मित्रांसोबत घेतलेली चहाची चुसकी आठवते. चहा प्रेमींच्या तर चहासोबत बऱ्याच आठवणी जुळलेल्या असतात. पण तुम्हाला माहिती आहे का टपरीवरचा चहा एवढा फेमस का? (International Tea Day why tapri wali chai famous )

मुळात आईच्या किंवा बायकोच्या हातच्या चहाची तुलना कुणासोबतही करता येणार नाही पण मित्रांसोबत कट्टयावर घेत असलेल्या चहानेही अनेकांच्या मनात एक वेगळीच जागा बनवली आहे.

कधी मध्येच येणारी चहाची तल्लप, मित्र प्रेम, मिटींग, घरापासून दुर असलेले मंडळी यामुळे अनेकजण सहज टपरीवरच्या चहाकडे वळताना दिसतात.

अनेक आठवणींमुळे टपरीवरच्या चहाची मजा द्वीगुणीत होते. याच टपरीवर कधी ऑफीसमधल्या चर्चा रंगतात तर कधी लव्हस्टोरीच्या कहाण्या ऐकायला मिळतात. कधी याच टपरीवरच्या चहाने टेन्शनपासून मुक्त करणारा क्षणभराचा श्वास घेता येतो तर कधी अचानक आलेल्या डोकेदुखीचा त्रास दूर होतो.

याच टपरीवर कधी घरच्या समस्या शेअर होतात तर कधी मैत्रीतले नाते दृढ होतात. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात चहाची टपरीची एक वेगळी जागा आहे.

याशिवाय हल्ली टपरी वरील चहा व्यवसायाच्या दृष्टीने कमावण्याचा उत्तम मार्ग बनलाय. अनेक तरुण मंडळी व्यवसायाच्या दृष्टीकोणातून चहाच्या टपरीकडे बघतात आणि बक्कळ पैसा कमावतात.

टपरीवरचा चहाचा ट्रेंड चित्रपटातही दिसून येतो. त्यामुळे अनेकजण याचे अनुकरण करताना दिसतात. याशिवाय टपरीवरचा चहा पिण्यामागे आणखी एक कारण म्हणजे सिगारेट किंवा तंबाखूचं व्यसन. चहाच्या टपरीवर अनेकदा सिगारेट, तंबाखू सहज उपलब्ध असतो. त्यामुळेही अनेकजण चहाच्या टपरीकडे वळतात.

खरं तर चहा हा चहाप्रेमींसाठी नेहमी खास असतो. मग तो चहा घरचा असो की ऑफीसच्या कँटीनचा की महागड्या हॉटेलचा की टपरीवरचा. चहा हा चहा प्रेमींसाठी नेहमीच खास असतो. एकदा चहाची तल्लफ आली की चहा प्यायला चहाप्रेमी हजर असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT