Yoga sakal
देश

International Yoga Day : इजिप्तमधील तरुणाईने जाणले योगासनांचे महत्त्व

आंतरराष्ट्रीय योगदिन भारतासह जगभरात शुक्रवारी (ता.२१) उत्साहात साजरा झाला. यानिमित्त इजिप्तमधील भारतीय दूतावासानेही कैरोमध्ये योग कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय योगदिन भारतासह जगभरात शुक्रवारी (ता.२१) उत्साहात साजरा झाला. यानिमित्त इजिप्तमधील भारतीय दूतावासानेही कैरोमध्ये योग कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात मोठा प्रतिसाद मिळाला.

योगदिनाच्या कार्यक्रमातील उत्साही सहभागाबद्दल इजिप्तमधील भारताचे राजदूत अजित गुप्ते यांनी नागरिकांचे स्वागत केले आहे. इजिप्तमध्ये योग अधिकाधिक लोकप्रिय होत आहे, असे सांगताना ‘दक्षिण इजिप्तमधून उत्तरेकडे वाहणाऱ्या नाईल नदीप्रमाणे इजिप्तमध्ये योगाचा प्रसार होत आहे,’ या एका योग अभ्यासकाच्या टिपणीचा उल्लेख गुप्ते यांनी निवेदनात केला आहे.

योगदिनाच्या पार्श्वभूमीवर लक्झर, हरघडा, अलेक्झांड्रिया, मिनिया आणि इस्माइलियासह इजिप्तमधील अनेक ठिकाणी काही दिवसांपासून कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. याशिवाय भारतीय सांस्कृतिक केंद्राने अल-नसर क्लब आणि गेझिरा स्पोर्टिंग क्लब यांच्या सहकार्याने वजन व्यवस्थापन, सुदृढ मणका आणि तणावमुक्ती या विषयावर विशेष योग शिबिराचे आयोजन केले होते.

आंतरराष्ट्रीय योगदिनाचा एक भाग म्हणून इजिप्तमधील ‘मौलाना आझाद सेंटर फॉर इंडियन कल्चर’ (एमएसीआयसी) ‘प्रसिद्ध स्थळांवर योग’ (योगा ॲट आयकॉनिक प्लेस) या स्पर्धेचे आयोजन केले होते. या नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. अनेक इजिप्शियन तरुणांनी पिरॅमिड, लक्सर मंदिर, नाईल नदी, लाल समुद्र, काळा आणि पांढरे वाळवंट यांसारख्या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांवर योगासने करतानाची छायाचित्रे समाज माध्यमांवर शेअर केली आहेत, अशी माहिती गुप्ते यांनी दिली.

इजिप्त सरकारचा पाठिंबा

ते म्हणाले, की या वर्षीच्या योगदिनाची संकल्पना ‘स्वतःसाठी आणि समाजासाठी योग’ अशी होती. भारतीय दूतावासाने इजिप्तमध्ये वर्षभर आयोजित केलेल्या विविध योग कार्यक्रमांमध्ये सुमारे २० हजार नागरिकांनी घेतला. इजिप्तचे अरब प्रजासत्ताक सरकार, युवा आणि क्रीडा मंत्रालय आणि प्रशासनाने ठाम पाठिंबा मिळाला. योग कार्यक्रमांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि सहभागाने आरोग्य आणि आनंदी संस्कृतीचा प्रसार करण्याची संयुक्त बांधिलकी अधोरेखित होते.

पंतप्रधान मोदींकडून कौतुक

योगदिनी काल श्रीनगरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तमध्ये योगासनांबद्दलच्या वाढत्या लोकप्रियतेवर भाष्य केले होते. त्यात त्यांनी ‘योगा ॲट आयकॉनिक प्लेस’ स्पर्धेचा आवर्जून उल्लेख केला होता. पिरॅमिडसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर केलेल्या योगमुद्राची छायाचित्रे शेअर केल्याबद्दल इजिप्तच्या तरुण आणि तरुणींचे कौतुकही केले होते, असे निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT