देश

iPhone मागवला, पैसे देण्याऐवजी डिलिव्हरी बॉयचा केला खून; मृतदेहाची 'अशी' लावली विल्हेवाट

संतोष कानडे

iPhone Delivery Murder in UP: एका ग्राहकाने फ्लिपकार्टवरुन आयफोन खरेदी केला होता. जेव्हा डिलिव्हरी बॉय आयफोन घेऊन आला तेव्हा त्या ग्राहकाने आणि त्याच्या मित्राने त्याची हत्या केली. आयफोनमुळे हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये ही घटना घडली आहे. दोन लोकांनी कथितपणे आयफोनच्या कारणावरुन डिलिव्हरी बॉयचा खून केला आणि त्याचा मृतदेह एका कालव्यामध्ये फेकून दिला. ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयची ओळख पटली असून भारत साहू असं त्याचं नाव आहे.

दि. २३ सप्टेंबर रोजी आरोपी गजानन आणि त्याचा मित्र आकाश यांनी भारतचा खून केला. त्यानंतर दोघांनी मिळून त्याचा मृतदेह इंदिरा कालव्यामध्ये फेकून दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा बेपत्ता तरुणाला शोधण्यासाठी तपास सुरु होता, तेव्हा हा प्रकार समोर आला.

आयफोन घेऊन आलेल्या भारत साहूला गजानन याने दीड लाख रुपये द्यायचे होते. परंतु त्यांनी पैसे तर दिलेच नाही, उलट गजानन आणि त्याचा मित्र आकाश या दोघांनी भारतचा खून केला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिस उपायुक्त शशांक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनहट येथील गजानन याने फ्लिपकार्टवरुन कॅश ऑन डिलिव्हरी या सुविधेनुसार १.५ लाख रुपयांचा आयफोन मागवला होता. २३ सप्टेंबर रोजी निशातगंज भागात भारत साहू फोन घेऊन त्याच्या घरी पोहोचला. तेथे गजानन आणि त्याच्या सहकाऱ्याने भारतचा खून केला. त्याचा गळा दाबून हत्या केली असून मृतदेह पोत्यात भरुन इंदिरा कालव्यात फेकून दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Baba: वाराणसीतल्या मंदिरांमधून साई बाबांच्या मूर्ती हटवल्या अन् गंगेत केल्या विसर्जित; सनातन रक्षक दलाचं कृत्य

Shivneri Bus: शिवनेरी बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'; हवाई सेवेच्या धर्तीवर भरत गोगावलेंची पहिलीच मोठी घोषणा

Sharad Pawar: सर्वात मोठी खेळी! शरद पवारांच्या पक्षात हा मोठा पक्ष होणार विलिन; हजारो कार्यकर्त्यांचा या दिवशी प्रवेश

Latest Maharashtra News Live Updates: राज ठाकरे ऑक्टोबरमध्ये संभाजीनगर, नाशिक अन् पुणे दौऱ्यावर

''या क्षणाला आम्हालाही खात्री नाही''; MS Dhoniच्या आयपीएल २०२५ खेळण्याबाबत CSK चं मोठं विधान; त्याला Uncapped...

SCROLL FOR NEXT