IPS 
देश

गोव्यातील नाईट क्लबमध्ये महिलेशी गैरवर्तन; आयपीएस अधिकारी निलंबीत

सकाळ डिजिटल टीम

पणजी - गेल्या आठवड्यात एका नाईट क्लबमध्ये महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने गोव्यात तैनात असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. अधिकृत सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली.

आदेशात म्हटले की, अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश (AGMUT) कॅडरचे 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी ए कोआन यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात विभागीय कार्यवाही प्रलंबित असल्याचही नमूद करण्यात आलं.

गृह मंत्रालय हे आयपीएस अधिकार्‍यांसाठी संवर्ग नियंत्रण प्राधिकरण आहे. गोवा सरकारकडून प्राथमिक चौकशी अहवाल मंत्रालयाला प्राप्त झाल्यानंतर हा आदेश जारी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आदेशात म्हटले की अधिकारी राज्य पोलिस मुख्यालयाशी संलग्न असेल आणि निलंबन आदेश लागू होईपर्यंत तेथील अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

उपमहानिरीक्षक (डीआयजी) दर्जाच्या या अधिकाऱ्याला यापूर्वी गोवा सरकारने त्यांच्या पदावरून पदमुक्त केले होते. तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) अहवाल देण्यास सांगितले होते. या अधिकाऱ्यावर कडक कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले होते. शिवाय गोवा फॉरवर्ड पार्टीचे (जीएफपी) आमदार विजय सरदेसाई यांनी देखील गैरवर्तनाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीसांना पटोलेंचं उत्तर; म्हणाले, महायुती...

Assembly Elections: महायुतीत जागावाटपाचा पेच वाढणार? देवेंद्र फडणविसांना पत्र, रामदास आठवलेंकडून 'इतक्या' जागांची मागणी

Nikki Tamboli : "ते सगळं फेक.." निक्की बनली अरबाजचं नातं तुटण्याचं कारण ? निक्कीकडूनच खुलासा

Ajit Pawar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 'ती' कृती अन् विधान;अजित पवारांना मान खाली घालून हसू आवरेना

"अभिनेत्रींनी चेहऱ्यावर बोटॉक्सचा भडीमार करणं चुकीचं" ; मर्डर फेम मल्लिका शेरावतने व्यक्त केली चिंता , कास्टिंग काऊचबद्दल म्हणाली

SCROLL FOR NEXT