New Technology in Indian Railway : रेल्वेचा हॉर्न दूर दूर पर्यंत ऐकायला जावा एवढ्या मोठ्या आवाजात वाजतो. त्यामुळे रात्र अपरात्र असो, किंवा अगदी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभे असाल तर कानठळ्या बसवणारा हॉर्न आता वाजणार नाही. शताब्दी, राजधानी, तेजस सारख्या मोठ्या रेल्वेपासून लोकल ट्रेन पर्यंत कोणत्याही ट्रेनचा कानठळ्या बसणारा हॉर्न ऐकायला येणार नाही.
आता रेल्वे लवकरच स्टेशन आणि रेल्वेमध्ये ध्वनी प्रदुषण आणि वायू प्रदुषण कमी करण्यासाठी नवी टेक्नॉलॉजी आणणार आहे. EMU - MEMU ट्रेन ला हेड ऑन जनरेशन च्या रेल्वेमध्ये बदलले जाणार आहे. EMU - MEMU, कोलकत्ता मेट्रो आणि वंदे भारत ट्रेनमध्ये IGBT आधारीत ३ फेजची टेक्नॉलॉजी लवकरच फिक्स केली जाणार आहे.
हे ही वाचा - ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...
सध्या वंदे भारत एक्स्प्रेसला स्वयंचलित दरवाजे, वायफाय, जीपीएस संबंधित प्रवासी सुचना आणि एलईडी प्रणालीसह सुसज्ज आहे. तर GPS आधारित प्रवासी घोषणा अर्थात पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम (PAPIS) देखील EMU आणि कोलकता मेट्रोमध्ये लावण्यात आली आहे. प्रवासी माहिती प्रणाली ट्रेनमध्ये आवाजाद्वारे आगामी स्थानकाची माहिती देते. यासोबतच ते व्हिडिओ स्क्रीनवरही प्रदर्शित होत राहते.
मुंबईसह पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेवर वातानुकूलित म्हणजेच एसी असलेल्या लोकल गाड्या याआधीच धावत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा आणि इमर्जन्सी टॉक बटणही बसवण्यात येत आहे. तर महिला कोचमध्ये प्रथम फ्लॅशर लाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. कोचची अलार्म चेन खेचल्यानंतर, चमकणारा प्रकाश आणि मोठा आवाज करणारा बजर देखील सुरू होईल.
31 ऑक्टोबरपर्यंत उच्च हॉर्स पॉवर लोकोमोटिव्ह असलेल्या 2811 रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग देखील करण्यात आले आहे. धुके किंवा अतिवेगाने गाड्या एकमेकांना धडकू नयेत यासाठी भारतीय रेल्वे सर्वत्र स्वयंचलित ट्रेन प्रोटेक्शन सिस्टम (कवच) स्थापित करत आहे. आतापर्यंत 1455 रेल्वे मार्गांवर 77 इंजिनमध्ये कवच बसवण्यात आली आहे.
देशातील विविध रेल्वे स्थानकांना अपग्रेड करण्याचे कामही रेल्वे करत आहे, नवी दिल्ली रेल्वे स्थानकाशिवाय कानपूर सेंट्रल, प्रयागराज, वाराणसी जंक्शन येथेही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.