Modi-Yogi-Shah sakal media
देश

युपीच्या निवडणुकीवर कोरोनाचा परिणाम?; BJP-RSS बैठकीत चिंतन

या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या स्थितीचा पंतप्रधान आणि भाजपच्या प्रतिमेवर काय परिणाम झालाय? तसेच पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर याचा काय परिणाम होऊ शकतो? याबाबत भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) महत्वाच्या चिंतन बैठक दिल्लीत पार पडली. रविवारी संध्याकाळी पार पडलेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांनी हजेरी लावली होती. (Is Coronas impact on next year UP assembly elections Contemplation BJP RSS meeting)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, RSSचे नेते दत्तात्रय होसबाळे आणि उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रभारी सुनील बन्सल हे देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत देशातील आणि विशेषतः उत्तर प्रदेशातील कोरोनाच्या स्थितीचा भाजपबद्दल सर्वसामान्यांमध्ये जो दृष्टीकोन तयार झाला आहे, याबाबत उच्च स्तरावर काळजी व्यक्त करण्यात आली.

कोरोनामुळं उत्तर प्रदेश चर्चेत

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. इथं कोरोनामुळं मृत्यू पावलेल्या लोकांचा मृत्यूदरही जास्त होता. तसेच गंगा नदीमध्ये तरंगणारे मृतदेह ही परिस्थिती हाताळण्यावरुन योगी आदित्यनाथ सरकारला अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्याचबरोबर कोरोनासंबंधीच्या प्रकरणांबाबत सरकारी आकडेवारीत पारदर्शकता नसल्याचे आरोपही योगी सरकारवर झाले आहेत.

उत्तर प्रदेशातून भाजपचे सर्वाधिक खासदार

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशातून संसदेत भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून गेले आहेत. पण याच राज्यात पुढील वर्षी सत्ता मिळवणं भाजपसाठी कठीण होऊ शकतं. कारण नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत हार पत्करावी लागल्यानं भाजपत नैराश्य आहे. कारण भाजपची सर्व यंत्रणा, टॉपचे नेते आणि निवडणूक यंत्रणाही ममतांचा विजय रोखू शकले नाहीत.

नड्डांनी भाजपशासित राज्यांना लिहिलं होतं पत्र

दरम्यान, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी आठवड्याभरापूर्वी केंद्रातील भाजप सत्तेला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्व भाजपशासित राज्यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रातून भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षाचं ब्रीदवाक्य 'सेवा ही संघटन' याची आठवण करुन देण्यात आली होती. कार्यकर्ते आणि नेत्यांनी सरकारी रुग्णालयांना औषधं, बेड्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT