ISIS India head arrested in Assam Esakal
देश

ISIS India head arrested in Assam: निवडणुकीत दहशत पसरवण्याचा कट उधळला; ISIS च्या भारतातील प्रमुखाला आसाममधून घेतलं ताब्यात

ISIS India head arrested in Assam: आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादी गट इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) च्या दोन दहशतवाद्यांना भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अटक केली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

ISIS India head arrested in Assam: आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादी गट इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) च्या दोन दहशतवाद्यांना भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीचे हे मोठे यश मानले जात आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, धुबरी जिल्ह्याजवळील बांगलादेशातून ISIS दहशतवादी भारतात घुसले आणि राज्यात काहीतरी मोठे करण्याचा त्यांचा विचार होता. पोलिसांनी सांगितले की, अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये ISIS इंडियाचा प्रमुख हॅरिस फारुकी आणि त्याच्या एका सहाय्यकाचा समावेश आहे.

आसाम एसटीएफचे महानिरीक्षक IPS पार्थसारथी महंता म्हणाले, "भारतातील ISIS चे दोन प्रमुख नेते शेजारच्या देशात (बांगलादेश) तळ ठोकून असल्याची माहिती एका एजन्सींकडून मिळाली होती. ते काहीतरी मोठे करण्यासाठी धुबरी सेक्टरमध्ये भारतात प्रवेश करतील".

माहिती मिळताच त्यांनी विशेष टीम तयार करून शोध मोहीम राबवली. आयजीपी पार्थसारथी महंत यांच्या नेतृत्वाखालील एसटीएफच्या पथकाने अतिरिक्त एसपी कल्याणकुमार पाठक आणि इतर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आणि त्यांना स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेतले.

एका निवेदनात आसामचे पोलिस मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रणवज्योती गोस्वामी यांनी सांगितले की, एका गुप्त माहितीच्या आधारे स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) दोघांना धरमशाला परिसरातून पकडले आणि नंतर त्यांना गुवाहाटी येथील एसटीएफ कार्यालयात आणले. या दोघांची ओळख पटली असून आरोपी हॅरिस फारुकी उर्फ ​​हॅरिस अजमल फारुकी (रा. चक्रता, डेहराडून) हा भारतातील इसिसचा प्रमुख असल्याचे आढळून आले आहे, असे त्यांनी सांगितले. तो म्हणाला की त्याचा साथीदार पानिपत निवावी अनुराग सिंग उर्फ ​​रेहान याने इस्लाम धर्म स्वीकारला असून त्याची पत्नी बांगलादेशी नागरिक आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दोघेही कट्टरपंथी आहेत. "त्यांनी भरती, दहशतवादी वित्तपुरवठा आणि भारतातील विविध ठिकाणी आयईडीद्वारे दहशतवादी कृत्ये घडवून आणण्यात ISIS ची मगत केली आहे.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या दोघांविरुद्ध एनआयए, दिल्ली, एटीएस आणि लखनऊ आणि इतर ठिकाणी अनेक खटले प्रलंबित आहेत. ते आसामची एसटीएफ या आरोपींना त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईसाठी एनआयएकडे सोपवेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हॅरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Captain David Warner: बंदी हटली अन् डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून मोठी बातमी

Mumbai Weather Update: येत्या काही दिवसात कसं असेल मुंबईचं तापमान? जाणून घ्या एका क्लिकवर..

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT