Suspected Terrorist Arrested नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. १५ ऑगस्टपूर्वी एजन्सीने ISIS चा सक्रिय सदस्य मोहसीन अहमद या दहशतवाद्याला (Terrorist) दिल्लीतून अटक (Arrested) केली आहे. ISIS मॉड्यूलच्या कारवायांच्या संदर्भात शोध घेतल्यानंतर अटक करण्यात आली. एनआयएने रविवारी मोहम्मद शकील अहमद (रा. F-१८/२७, जपानी गली, जोगाबाई एक्स्टेंशन, बाटला हाउस) याच्या निवासस्थानाची झडती घेतली.
एनआयएने २५ जून रोजी आयपीसीच्या कलम १५३A, १५३B आणि UA(P) कायद्याच्या कलम १८, १८B, ३८, ३९ आणि ४० अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अटक केलेला आरोपी हा कट्टरपंथी आहे. तसेच बंदी घातलेली दहशतवादी (Terrorist) संघटना ISIS चा सक्रिय सदस्य आहे. एनआयएच्या टीमने बाटला हाउसमधील घरावर छापा टाकला. तेथून संशयित मोहसीनला अटक (Arrested) केली. छाप्यादरम्यान घरातून अनेक गुन्ह्याची कागदपत्रे सापडली आहे.
मोहसीन दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य आहे. एनआयएने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एनआयएने २५ जून रोजीच एफआयआर नोंदवला होता. त्यानंतर सातत्याने तपास सुरू होता. पोलिस लक्ष ठेवून होते. संशयित हा घराच्या चौथ्या मजल्यावर भाड्याने राहत होता. मोहसीनवर सतत ISIS मॉड्यूलशी संबंध असल्याचा आरोप आहे.
क्रिप्टोकरन्सीद्वारे पैशांचा व्यवहार
मोहसीन हवाला क्रिप्टोकरन्सीद्वारे पैशांचा व्यवहार करीत होता. मोहसीनवर बाटला हाउसमध्ये राहून आजूबाजूच्या लोकांची आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. एजन्सी मोहसीनवर सतत नजर ठेवून होती. ठोस पुरावे सापडताच अटक करण्यात आली. आता क्रिप्टोकरन्सी आणि हवालाच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांना कोणी निधी दिला हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा हँडलर कोण आणि कुठे बसला आहे? पुढे तो कुठे पैसे पुरवत होता? पैसे कोणाकडे पाठवले जात होते? या सर्व बाबी तपासल्या जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.