delhi high court  sakal
देश

विवाहबाह्य संबंध असलेल्या पत्नीबाबत हायकोर्टचा मोठा निर्णय

विवाहबाह्य संबंध असल्याने पत्नीला आपल्या मालमत्तेपासून दुर ठेवत असल्याचा युक्तीवाद पतीने न्यायालयात केला होता.

सकाळ डिजिटल टीम

विवाहबाह्य संबंध असलेल्या पत्नीला तिच्या पतीच्या मालमत्तेपासून वंचित ठेवता येणार नाही, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court ) दिले. एका प्रकरणावर निकाल देताना उच्च न्यायालयाने या संबंधीत आदेश दिले. (Isolated acts of adultery by wife not ground to deny maintenance: HC)

या प्रकरणी न्यायालयाने आपल्या आदेशात पतीने पत्नीला ऑगस्ट 2020 पासून दरमहा 15,000 रुपये देण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देताना पतीने पैसे देण्यास वाद घातला. पत्नीची क्रूरता, विवाहबाह्य संबंध या कारणाने आपण पैसे देत नसल्याचे कारण त्यांने दिले तर उच्च न्यायालयाने पतीने मांडलेले कारण नाकारले.

न्यायालय म्हणाले, कायद्यानुसार सक्षम पुरुषाची पत्नी मुले निराधार होऊ नये हे सुनिश्चित करणे, गरजेचे आहे. सोबतच अशा कारणावरुन घटस्फोट होणाऱ्या प्रकरणांमध्येही न्यायालयाने पत्नीला पतीच्या मालमत्तेत हक्क दिलाय.

विवाहबाह्य संबंध म्हणजे काय?

लग्न झालेल्या पत्नी-पत्नी व्यतिरीक्त परस्त्री किंवा परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास विवाहबाह्य संबंध असं म्हटलं जातं. याला इंग्रजी मध्ये 'अडल्ट्री' (adultery) असं म्हणतात.

इंडियन पिनल कोड (IPC) म्हणजे भारतीय दंड संहितेच्या कलम 497 मध्ये विवाहबाह्य संबंधांची व्याख्या सांगण्यात आली होती.

सुप्रीम कोर्टाने 2018मध्ये 'विवाहबाह्य संबंध हा अपराध होऊ शकत नाही' असा ऐतिहासिक निर्णय दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने विवाहबाह्य संबंधाबाबत सुनावणी करताना विवाहबाह्य संबंध अपराध नाही, असं म्हटलं होतं.कोर्टाने 158 वर्षांपूर्वीचं भारतीय दंड संहितेतील कलम 497 अवैध ठरवलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT