S Somnath on Chandrayaan 3 eSakal
देश

Chandrayaan-3 : अमेरिकेलाही हवं होतं 'चांद्रयान-३'चं तंत्रज्ञान; इस्त्रो चीफनी सांगितला किस्सा

स्पेस टेक्नोलॉजीमध्ये भारताची कामगिरी मागील काही वर्षांमध्ये उल्लेखणीय राहिली आहे

रोहित कणसे

स्पेस टेक्नोलॉजीमध्ये भारताची कामगिरी मागील काही वर्षांमध्ये उल्लेखणीय राहिली आहे. अंतराळ संशोधनातील भारताचं तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत असून अमेरिकेकडून देखील भारताकडेया तंत्रज्ञानाची मागणी केली जात आहे. याबद्दल खुद्द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन (ISRO) चे चीफ एस सोमनाथ यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

इस्त्रोचे चीफ सोमनाथ यांनी सांगितलं की, चांद्रयान-३ मिशनसाठी स्पेसक्राफ्ट डेव्हलप करतेवेळी अमेरिकेच्या एक्सपर्ट्सनी ही टेक्नोलॉजीबाबतची माहिती भारताने अमेरिकेसोबत शेअर कराली असे सुचवले होते.

सोमनाथ माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या ९२व्या जयंतीनिमीत्त अब्दुल कलाम फाउंडेशनच्या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. यावेळी सोमनाथ म्हणाले की, आता वेळ बदलत आहे. आता भारत सर्वोत्तम रॉकेट आणि इतर उपकरणे बनवण्यात सक्षम आहे. हेच कारण आहे की पीएम मोदींनी स्पेस फील्ड खासगी प्लेयर्स (खासगी उद्योगांसाठी) खुले केले आहे.

सोमनाथ यांनी सांगितलं की, आपला देश खूप शक्तीशाली आहे. आपलं ज्ञान आणि बुध्दिमत्तेचा स्तर जगातील सर्वोत्तम स्तर आहे. चांद्रयान -३ मोहिमेसाठी जेव्हा आम्ही स्पेसक्राफ्ट डिझाईन आणि विकसीत केल तेव्हा NASA-JPL ची जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचे तज्ज्ञांना निमंत्रीत करण्यात आले. NASA-JPLने अमेरिकेतील सर्वात कठीण मिशन पूर्ण केले आहेत,ज्यामध्ये त्यांनी अनेक मोठ-मोठे रॉकेट डिझाइन केले आहेत.

सोमनाथ म्हणाले की, NASA-JPL मधून ५ ते ६ जण चांद्रयान-३ च्या सॉफ्ट लँडिगआधी इस्त्रोच्या मुख्यालयात आले होते. इस्त्रोच्या टीमने त्यांना चांद्रयान-३ बद्दल माहिती दिला. टीमने त्यांना हे मिशन कसे डिझाईन केलं आणि आपल्या इंजीनियर्सनी ये कसे तयार केले याबद्दल माहिती दिली. आपण चंद्राच्या पृष्ठभागावर कसे उतरणार आहोत याबद्दल देखील सांगितलं. सगळं ऐकून घेतल्यानंतर त्यांनी फक्त 'नो कमेंट' इतकीच प्रतिक्रिया दिली. NASA-JPL च्या टीमने सगळंकाही व्यवस्थित होणार असल्याचे सांगितले.

JPL किंवा जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी ही एक रिसर्च आणि डेव्हलपमेंट प्रयोगशाळा आहे. यामध्ये रिसर्चसंबंधी मोठे मोठे प्रयोग केले जातात. याला अमेरिकेची नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन कडून त्यांना फंड दिला जातो. याला संयुक्त राज्य अमेरिकेच्या कॅलिफोर्निया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीकडून मॅनेज केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : मुंबईवर कोणी हल्ला केला तर मोदी त्यांना पातळातूनही शोधून काढेन, सोडणार नाही - मोदी

SCROLL FOR NEXT