Chandrayan 3 
देश

Chandrayan 3: चांद्रयान 3 मोहिमेसाठी ISRO सज्ज; पुढील महिन्यात 'या' तारखेला होणार लॉन्च?

इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संसोधन संस्था (ISRO) चांद्रयान 3 साठी सज्ज झाली असून लवकरच ही मोहिम लॉन्च करण्यात येणार असल्याचं इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितलं. सतिश धवन स्पेस सेंटर इथून हे यानं चंद्राकडं झेपावणार आहे.

नेमकी ही मोहिम कधी सुरु होईल याचा अंदाजही इस्त्रो प्रमुखांनी सांगितला आहे. पण अंतिम तारीख सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच जाहिर केली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. (ISRO ready for Chandrayan 3 mission Launching date will be in next month says Isro chief S Somnath)

इस्त्रो प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले, "सध्या चांद्रयान ३ स्पेसक्राफ्ट पूर्णपणे तयार आहे, याच्या चाचण्याची जवळपास पूर्ण झाल्या आहेत. या मोहिमेसाठी १२ ते १९ जुलै दरम्यान चांगली संधी असणार आहे. पण संपूर्ण चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच याची नेमकी तारीख जाहीर केली जाईल"

भारताचं सर्वात वजनदार रॉकेट असलेल्या जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल मार्क ३ द्वारे चांद्रयान ३ चं लॉन्चिंग होणार आहे. यापूर्वी एस. सोमनाथ यांनी सांगितलं होतं की, १२ ते १९ जुलै दरम्यानचा कालावधी प्रक्षेपणासाठी योग्य आहे. या काळात कक्षीय गतिशीलेमुळं चंद्राच्या प्रवासात कमीत कमी इंधन आणि उच्च कार्यक्षमता राखता येईल. (Latest Marathi News)

चांद्रयान ३ च्या मोहिमेचा उद्देश काय?

चांद्रयान ३ हे चंद्राच्या पृथ्वीपासूनच्या सर्वाधिक दूर असलेल्या भागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. अशा प्रकारे सॉफ्ट लँडिंग करणं जर या चांद्रयानाला शक्य झालं तर भारत हा जगातील चौथा देश बनले ज्या देशाकडं अशा प्रकारे मोहिम करण्याची क्षमता आहे. यामध्ये अमेरिका, रशिया आणि चीन हे तीन देशांनी यापूर्वी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

यापूर्वीचं चांद्रयान २ मोहिम ठरली होती अपयशी

यापूर्वी चांद्रयान २ च्यावेळी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः बंगळुरु येथील इस्त्रोच्या मुख्यालयात उपस्थित होते. भारतासह अवघ्या जगाचं या मोहिमेकडं लक्ष होतं. पण हे यानं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करताना अपयशी ठरलं होतं. यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वी त्याचा लँडर विक्रमशी संपर्क तुटला होता. त्यानंतर त्याचे तुकडे झाले होते. त्यामुळं चांद्रयान २ चा ४७ दिवसांचा प्रवास अधुरा राहिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Candidates List: विधानसभेसाठी NCP अजित पवारांची पहिली यादी जाहीर, वळसे पाटलांसह 'इतक्या' उमेदवारांना संधी

Winter Baby Care: आयुर्वेदानुसार हिवाळ्यात लहान मुलांची कशी काळजी घ्यावी अन् त्यांचा आहार कसा असावा? वाचा डॉक्टर काय सांगतात

Chhota Rajan Gets Bail : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई हायकोर्टाचा दिलासा! जामीन मंजूर, जन्मठेपेलाही दिली स्थगिती

Solapur Vidhansabha 2024 : अक्कलकोटमध्ये यंदा बहुरंगी लढत, कल्याणशेट्टी यांच्या ‘प्रतिष्ठेची’ तर म्हेत्रे यांच्या ‘अस्तित्वाची’ निवडणूक

Pohardevi Mahant Left Shivsena UBT : विदर्भात ठाकरेंना फटका बसणार? पोहरादेवीच्या महंतांनी 'हे' गंभीर आक्षेप घेत सोडला पक्ष

SCROLL FOR NEXT