ISRO :इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ने शनिवारी चांद्रयान-3 लँडर विक्रमची चांद्रयान-2 ऑर्बिटरवरील उपकरणाद्वारे घेतलेले नवीन छायाचित्र जारी केले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शेअर केलेल्या चांद्रयान 3 च्या लँडरची प्रतिमा बुधवारी चांद्रयान 2 ऑर्बिटरवर ड्युअल-फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडार (DFSAR) उपकरणाद्वारे घेण्यात आली.
"6 सप्टेंबर 2023 रोजी चांद्रयान-2 ऑर्बिटरवर ड्युअल-फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडार (DFSAR) उपकरणाने घेतलेल्या चांद्रयान-3 लँडरचे छायाचित्र येथे आहे," असे अवकाश संस्थेने ट्विटरवर म्हटले आहे. ड्युअल-फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडार (DFSAR) हे चांद्रयानावरील महत्वाचं उपकरण आहे.
हे अत्याधुनिक साधन सध्या कोणत्याही ग्रह मोहिमेवर सर्वोत्तम रिझोल्यूशन ध्रुवीय छायाचित्र टिपण्यात येत. ASAR उपकरणांकडून दिलेल्या वारंवरितेच्या माईक्रोवेव्स पाठवल्या जातात आणि पृष्ठभागावरुन परावर्तित होऊन पुन्हा त्यांच वारंवारितेच्या वेव्स मिळतात.
सूर्य प्रकाश नसला तरी हे रडार छायाचित्र मिळवून देते. यामुळे वस्तुमधील अंतर समजते आणि वैशिष्टांची माहिती देखील मिळते. त्यामुळे SARचा वापर पृथ्वीच्या पृष्ठभागाची आणि अवकाशातील गोष्टींची रिमोट सेन्सिंग करण्यासाठी वापरले जाते. (Latest Marathi News)
चांद्रयान-3 लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून सुमारे 600 किमी खाली आले आहे, असे नासाने म्हटले आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 लँडर 'विक्रम'चे छााचित्र जारी केली आहे. हे छायाचित्र लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर यानाने टिपली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.