BBC IT Raid News  
देश

BBC IT Raid : BBC कार्यालयावर IT रेड नव्हे तर, सर्व्हे; जाणून घ्या IT Raid अन् IT Survey मधील फरक

बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात आयकर विभागाने मंगळवारी 'सर्व्हे' केला.

सकाळ डिजिटल टीम

IT Action On BBC Office India : बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात आयकर विभागाने मंगळवारी 'सर्व्हे' केला.

हेही वाचा : सोन्याची झळाळी आगामी काळात आणखी वाढणार?

सर्वसामान्यांच्या भाषेत याला आयकराचा छापा असे संबोधले जात आहे. मात्र, IT Raid आणि IT Survey यात मोठा फरक आहे. आज आम्ही या दोन्ही कारवायांमध्ये नेमका काय फरक आहे याबद्दल सांगणार आहोत.

2002 च्या गुजरात दंगलीवर बीबीसीने तयार केलेल्या माहितीपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आज दिल्ली आणि मुंबईतील BBC च्या कार्यालयांवर आयकर विभागाकडून मंगळवारी दोन्ही शहरांमधील कार्यालयांमध्ये 'सर्वेक्षण' करण्यात आले.

आयकर कायद्यात दोन्हींच्या व्याख्या वेगळ्या

बीबीसीच्या कार्यालयांवर करण्यात आलेल्या या कारवाईला अनेकजण आयकर विभागाची छापेमारी असे समजत आहे.

परंतु, आयकर कायद्यात 'इन्कम टॅक्स सर्व्हे' आणि 'इन्कम टॅक्स रेड'ची स्वतंत्रपणे व्याख्या करण्यात आली आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे Raid हा शब्द इन्कम टॅक्स कायद्यामध्ये इंग्रजीमध्ये वापरला गेलेला नाही, परंतु 'Search' आणि 'Survey' या दोन भिन्न शब्दांची व्याख्या करण्यात आली आहे.

'आयटी सर्व्हे' म्हणजे काय?

प्राप्तिकर कायद्यानुसार, जेव्हा कर अधिकारी कोणतही अघोषित उत्पन्न किंवा लपवलेली मालमत्ता उघड करण्यासाठी कारवाई करतात, तेव्हा त्याला IT Survey असे संबोधले जाते.

अशा प्रकारच्या कारवाईचा उद्देश केवळ माहिती गोळा करणे हाच असतो. एवढेच नव्हे तर संबंधित व्यक्तीने किंवा कार्यालयाने खाती पुस्तकांचे व्यवस्थित आयकर सर्वेक्षणही केले आहे की नाही हे तपासण्यासाठी असते.

आयकर कायदा-1961 च्या कलम-133A अंतर्गत कर अधिकारी 'आयकर सर्वेक्षण' करतात. हा कायदा 1964 मध्ये लागू करण्यात आला असून, वित्त विधेयक-2002 च्या माध्यमातून यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या.

'आयटी सर्च' म्हणजे काय?

आयकर कायद्याच्या कलम-132 मध्ये 'आयकर छापा' ची व्याख्या आहे. सामान्य लोक याला आयटी रेड मानतात. करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये कर अधिकाऱ्यांकडून सहसा अशा प्रकारची छापेमारी केली जाते.

'इन्कम टॅक्स रेड' अंतर्गत एखाद्या व्यक्तीच्या किंवा व्यवसायाच्या इमारतीवर, घरावर किंवा कोणत्याही प्रकारच्या ठिकाणांवर कारवाई केली जाऊ शकते. इतकेच नाही तर, आयकर छाप्यांमध्ये कागदपत्रे, मालमत्ता, दागिने आणि अघोषित रोकड इत्यादी जप्त करण्याचा अधिकार कर अधिकाऱ्यांना आहे.

'सर्व्हे' आणि 'सर्च' मधील फरक

  • आयकर सर्वेक्षणादरम्यान कर अधिकारी केवळ व्यवसायाच्या कामकाजाच्या वेळेतच तपास करू शकतात. आयकर छाप्यांमध्ये अशी कोणतीही सक्ती नसते.

  • आयकर सर्वेदरम्यान अधिकारी केवळ कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी कारवाई करू शकतात. त्यात घर किंवा इतर जागेचा समावेश नाही. तर, आयकर छाप्याच्या कारवाईमध्ये संबंधित व्यवसाय किंवा व्यक्तीच्या कोणत्याही जागेवर छापा टाकला जाऊ शकतो.

  • आयकर छाप्यांमध्ये कर अधिकाऱ्यांना कागदपत्रे आणि मालमत्ता इत्यादी जप्त करण्याचा अधिकार आहे. या काळात कर अधिकार्‍यांना सतर्क राहावे लागते. कारण या कालावधीत घडलेल्या प्रत्येक हालचालींसाठी संबधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाऊ शकते.

  • इन्कम टॅक्सच्या छाप्यादरम्यान, जर विरुद्ध पक्षाने कर अधिकाऱ्यांना सहकार्य न केल्यास अध्कारी दरवाजा किंवा खिडकी तोडून आत प्रवेश करू शकतात. तसे अधिकार देंण्यात आले आहे. आयकर सर्व्हेदरम्यान हे करता येत नाही. आयकर सर्वेक्षणादरम्यान संबधिथ कार्यालयाल किंवा व्यवसायाला नोटीस जारी करता येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT