Video: भारतात येण्यासाठी बांगलादेशीही देताहेत ‘जय श्री राम’ अन् 'भारत माता की जय'चे नारे, सीमेवर नेमकं काय घडतयं?
बांगलादेश सोडून भारतात आश्रय घेण्यासाठी शेकडो लोक सीमेवर गर्दी करत आहेत. तणावाच्या काळात प्रत्येकाला भारतात आश्रय हवा आहे. दरम्यान बीएसएफ या बांगलादेशी नागरीकांना रोखत आहे.
काही लोकांनी अवामी लीगच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. तर काही जण ‘जय श्री राम’च्या घोषणा देताना दिसले.
भारत-बांगलादेश सीमेवर कूचबिहारमधील सीतालकुचीच्या पठाथुलीमध्ये असेच दृश्य पाहायला मिळाले. येथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान बांगलादेशात अनेक ठिकाणी परिस्थिती बिघडली आहे. देशाच्या अनेक भागांतून तोडफोड आणि लूटमारीच्या तक्रारी येत आहेत. अशा परिस्थितीत अनेक बांगलादेशी आपली घरे सोडून भारतात आश्रयासाठी येत आहेत.
बुधवारीही जलपाईगुडीतील बेरुबारी येथे बांगलादेश सीमेवर अनेक लोक जमले होते. त्या ठिकाणी काटेरी तार नाही. बीएसएफने सांगितले की ते झिरो पॉइंटवर थांबले होते. सर्वांना भारतात येण्याची परवानगी हवी आहे. मात्र, बीएसएफने बॉर्डर गार्ड बांगलादेशशी बोलून त्यांना परत पाठवले.
बांगलादेश सोडून भारतात येण्यासाठी शुक्रवारी सीतालकुची येथील पठाथुली येथे शेकडो लोक जमले. मात्र, सीमेवर कुंपण ओलांडण्यापूर्वीच बीएसएफने त्यांना रोखले. त्यानंतर ते झिरो पॉइंटवर जमिनीवर बसले आणि हसिना सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करू लागले.
बीएसएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नागरीक बांगलादेशातील लालमनिरहाट जिल्ह्यातील गायबांडा, पश्चिम गोतामारी, पूर्व गोतामारी, दकातारी भागातून आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशी हसीना यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्याबरोबरच ते 'भारत माता की जय', 'जय श्री राम'च्या घोषणाही देत होते.
पंतप्रधानांचे आभार
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पुत्र साजिब वाजिद जॉय यांनी पुन्हा सांगितले की, शेख हसीना यांचा कोणत्याही देशात आश्रय घेण्याचा कोणताही विचार नाही. त्या फक्त भारतातच राहील.
यासोबतच त्यांनी आपल्या आईचे प्राण वाचवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत, त्यांनी आईला भारतात येण्याची परवानगी दिली, अन्यथा बांगलादेशात तिची हत्या झाली असती, असेही ते म्हणाले.
जॉय म्हणाले, देशभरात अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यांनंतर त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. आईची ही शेवटची टर्म होती. ती पुढची निवडणूक लढवणार नव्हती. मलाही राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. पण, गेल्या काही दिवसांत जे काही घडले त्यावरून देशाच्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाल्याचे दिसून येते. देशातील जनता आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी मला राजकारणात प्रवेश करावा लागणार आहे. पुढील निवडणुकीत अवामी लीग सहभागी होणार असून ते निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास जॉय यांनी व्यक्त केला. एजन्सी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.