Jairam Ramesh sakal
देश

Jairam Ramesh : हरियाना अन् दिल्लीत ‘आप’शी आघाडी नाही

प्रशांत पाटील

नवी दिल्ली : विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने आता वेगाने सूत्रे हलवायला सुरूवात केली असून हरियाना आणि दिल्लीमध्ये काँग्रेसची आम आदमी पक्षासोबत आघाडी होण्याची शक्यता कमीच आहे. महाराष्ट्र व झारखंडमध्ये मात्र इंडिया आघाडी एकत्रितपणे लढेल असे सूचक वक्तव्य पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केले.

रमेश म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. स्थानिक नेत्यांचे म्हणणे विचारात घेऊनच पुढची पावले टाकण्यात येतील. पंजाब व हरियानात विधानसभेसाठी आघाडी होण्याची शक्यता कमीच आहे. दिल्लीत ‘आप’ने च आघाडीची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेस आणि ‘आप’ने दिल्लीत लोकसभा निवडणूक एकत्रित लढविली होती पण पंजाबमध्ये मात्र आम्ही वेगळे लढलो होतो. पश्चिम बंगालमध्ये स्थानिक नेत्यांनी आघाडीचा आग्रह धरला असून महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष यांच्याशी आमची आघाडी आहे. झारखंडमध्ये आम्ही ‘झामुमो’सोबत आघाडी करून लढत आहोत.’’

राजकीय पोळी शेकणे थांबवा:" खर्गे

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेमध्ये अडीच तास भाषण करतात परंतु यात महागाईवर अडीच शब्द सुद्धा नाही. लोकांच्या मुद्यांवर पंतप्रधानांनी बोलावे, उगीच बिनमहत्त्वाचे मुद्दे उकरून राजकीय पोळी शेकणे त्यांनी बंद करावे,’’ असा टोला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला आहे. ते म्हणाले, ‘‘देशातील जनता कष्टाची कमाई करते. तुम्ही मात्र खोट्या मुद्यांवर राजकीय पोळी शेकता. जनतेच्या ताटातील पोळी काढून घेण्याचे काम बंद करावे व महागाईवर नियंत्रण आणावे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT