Jammu and Kashmir  sakal
देश

Jammu and Kashmir : हौतात्म्य व्यर्थ जाऊ देणार नाही;संरक्षण सचिवांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमधील कथुआ येथे सोमवारी जवानांवर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाऊ देणार नाही या हल्ल्यात ज्यांचा हात आहे, त्यांना अद्दल घडविण्यात येईल, असे प्रतिपादन संरक्षण सचिव गिरिधर आरमाने यांनी मंगळवारी केले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीदेखील या हल्‍ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, लष्कर जम्मू-काश्‍मीरमध्ये शांतता टिकवून ठेवण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले आहे. कथुआ येथे सोमवारी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

यामध्ये पाच जवान हुतात्मा झाले तर पाच जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर जवानांनी या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. ‘‘या जवानांनी देशासाठी केलेले सर्वोच्च बलिदान देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील, या अत्यंत कठीण प्रसंगी सर्व देशवासीय या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या आणि जखमी झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांबरोबर ठाम उभे आहेत. या भागात दहशतवादविरोधी मोहीम हाती घेण्यात आली असून आपले जवान येथे शांतता टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत,’’ असे प्रतिपादन सिंह यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून केले आहे.

‘‘पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. या आधीही अशा दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला होता आणि भविष्यातही या दहशतवाद्यांना संपविण्यात येईल. त्यांचे भारतविरोधी मनसुबे उधळून लावण्यात येतील.’’

रवींद्र रैना, भाजपचे जम्मू-काश्‍मीर प्रदेशाध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT