Drone 
देश

जम्मू-काश्मीर: स्फोटकांनी लगडलेला ड्रोन पाडला; सुरक्षा रक्षकांची मोठी कारवाई

या ड्रोनद्वारे सीमेपलिकडून जम्मू-काश्मीरमध्ये घातपाताचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कठुआ : जम्मू-काश्मीरमध्ये स्फोटकांनी भरलेला ड्रोन सुरक्षा रक्षकांना उद्ध्वस्त करण्यात यश आलं आहे. सीमेपलिकडून अर्थात पाकिस्तानातून हा ड्रोन ऑपरेट करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांकडून कळते. ड्रोन उद्ध्वस्त करण्यात आल्यानं दहशतवाद्यांचा मोठा घातपाताचा प्रयत्न फसल्याचं बोललं जात आहे. (Jammu and Kashmir drone shot down which covered with Explosives Major action done by Police)

या घटनेबाबत माहिती देताना जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितलं की, कठुआ जिल्ह्यातील राजबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तल्ली हरिया चाक भागात हा ड्रोन आकाशात घिरट्या घालत होता. जो सीमेच्या बाजूनं येत होता. हा ड्रोन पाडल्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं त्याची कसून तपासणी केली.

तपासणीनंतर या ड्रोनला 7 UBGLs (अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर) आणि 7 चिकट आणि मॅग्नेटिक बॉम्ब लावले होते. ही सर्व स्फोटकं जप्त करण्यात आली असून याचा पुढील तपास बॉम्ब डिस्पोजल स्क्वाडकडून सुरु आहे, अशी माहिती कठुआच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.

सीमावर्ती भागात दहशतवाद्यांकडून अशा छुप्या पद्धतीनं आपली कारस्थान सुरु असतात. यामध्ये आता ड्रोनसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापरही वाढला आहे. रिमोट तंत्रज्ञानानं ऑपरेट केल्या जाणाऱ्या ड्रोनच्या माध्यमातून दहशतवादी सीमापार बसून भारतीय हद्दीत आपल्या कारवाया घडवून आणण्याच्या प्रयत्नात असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT