Jammu and Kashmir High Court  sakal
देश

Jammu and Kashmir High Court : कोटेश्वर सिंह, आर. महादेवन नवे ‘सर्वोच्च’ न्यायाधीश

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. कोटेश्वर सिंह तसेच मद्रास उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश आर. महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमने मागील आठवड्यात न्यायाधीश सिंह आणि न्यायाधीश महादेवन यांच्या नियुक्तीची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे एकूण संख्याबळ ३४ इतके आहे.

वरील दोन न्यायाधीशांनी शपथ घेतल्यानंतर न्यायालयातील सर्व ३४ जागा भरल्या जातील. मूळचे मणिपूरचे असलेले न्यायाधीश सिंह हे जम्मू काश्मीर उच्च न्यायालयात फेब्रुवारी २०२३ पासून कार्यरत आहेत. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती होणारे मणिपूरचे ते पहिले न्यायाधीश ठरले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT