Jammu and Kashmir terror attacks BJP leader killed couple injured lok sabha election 2024 
देश

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

या घटनेनंतर पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी तातडीने या भागाचा ताबा घेत नाकेबंदी सुरू केली.

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर, ता. १९ (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्‍मीरमधील बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात उद्या (सोमवार) मतदानाबाबत उत्सुकता असतानाच अनंतनाग आणि शोपियाँ या जिल्ह्यांत दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शोपियाँमधील हल्ल्यात भाजपचे कार्यकर्ते आणि माजी सरपंचाचा मृत्यू झाला, तर अनंतनागमधील पहलगाम येथे पर्यटनस्थळावर झालेल्या गोळीबारात एक दाम्पत्य जखमी झाले.

अनंतनागमधील पहलगाम येथे सध्या पर्यटक मोठ्या संख्येने आलेले आहेत. दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास यन्नार भागात बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात तबरेज आणि फराह हे दाम्पत्य जखमी झाले. हे दोघे राजस्थानमधील जयपूर येथे राहणारे असून काश्‍मीरमध्ये फिरण्यासाठी आले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेनंतर पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी तातडीने या भागाचा ताबा घेत नाकेबंदी सुरू केली. या घटनेबाबत पुरेशी माहिती गोळा केली जात असतानाच अर्ध्या तासांतच शोपियाँ जिल्ह्यातील हिरपोरा भागात दहशतवाद्यांनी भाजपचे नेते एझाज शेख यांची गोळ्या झाडून हत्या केली. शेख हे माजी सरपंच होते. गोळीबारात शेख हे गंभीर जखमी झाले. तातडीने रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गोळीबारानंतर सुरक्षा जवानांनी परिसराची नाकेबंदी करत शोध मोहीम सुरू केली आहे.

जम्मू-काश्‍मीरमधील बारामुल्ला मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. पुढील टप्प्यात (२५ मे) अनंतनाग-राजौरीमध्ये मतदान होत असून येथे प्रचारासाठी राष्ट्रीय नेत्यांचेही दौरे होत आहेत. अनंतनागमध्ये ७ मे रोजीच मतदान होणार होते. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे हे मतदान पुढे ढकलल्याचे सांगण्यात आले. दहशतवाद्यांच्या हालचाली हे देखील यामागील कारण असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर हे दोन हल्ले झाल्याने सुरक्षा यंत्रणा आणखी सावध झाली आहे.

राजकीय पक्षांकडून निषेध


- मेहबूबा मुफ्ती (पीडीपी) : मतदानाच्या काही दिवस आधीच हल्ला होणे, ही चिंतेची बाब आहे.
- उमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स) : जम्मू-काश्‍मीरमधील शांततेच्या मार्गात अद्यापही अनेक अडथळे आहेत. त्यामुळे सर्वांनी ठाम राहून शांततेसाठी प्रयत्न करावेत.
- प्रदेश भाजप : या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो. हल्ल्याचा सखोल तपास आवश्‍यक आहे.


भाजपच्या कार्यकर्त्याला दहशतवाद्यांनी मारले की स्थानिक असलेल्या कोणीतरी, याचा तपास करावा लागेल. दहशतवाद येथे अद्यापही शिल्लक आहे आणि ते लोकांवर हल्ले करत आहेत, हे यातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी वेगाने तपास करणे आवश्‍यक आहे.
- फारुख अब्दुल्ला, अध्यक्ष, नॅशनल कॉन्फरन्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT