Hemant Lohia Murder Case esakal
देश

Hemant Lohia : पोलीस महासंचालकाची हत्या; मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना मोठं यश

पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.

Hemant Lohia Murder Case : जम्मू-काश्मिरचे पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया (Jammu and Kashmir DG Hemant Lohia) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या यासिरला अटक करण्यात आलीय.

रात्री (सोमवार) उशिरा 11.45 च्या सुमारास हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेत त्यांचा नोकर यासिर अहमद (Yasir Ahmed) याचं नाव समोर आलं होतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो खून केल्यानंतर पळताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिर हा गेल्या 6 महिन्यांपासून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या घरी काम करत होता.

दरम्यान, लोहियांच्या हत्येप्रकरणी आरोपी यासिरला कानाचक परिसरातून आज अटक करण्यात आली. जम्मू-कश्मीर पोलीस लवकरच या प्रकरणाची माहिती शेअर करणार आहेत. आरोपी यासिर हा पोलीस अधिकाऱ्याच्या घरी काम करायचा आणि या घटनेपासून तो बेपत्ता होता. पोलिसांनी त्याच्याकडून एक डायरीही जप्त केल्याचं बोललं जात आहे.

याबाबत तपास सुरू असून जम्मू आणि राजौरीमध्ये इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आलीय. डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरवाजा बंद करून आरोपींनी डीजीची हत्या केली होती. लोहिया काही दिवसांपासून मित्राच्या घरी राहत होते. त्याचबरोबर आरोपी हा आक्रमक आणि अस्थिर व्यक्ती असल्याची माहितीही त्यांनी दिली.

PAFF नं स्वीकारली जबाबदारी

पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (People's Anti-Fascist Front PAFF) नावाच्या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर या संघटनेचं नाव समोर आलं. याआधीही या संघटनेनं अनेकदा व्हिडिओ जारी करून धमक्या दिल्या आहेत. ऑक्टोबर 2021 मध्ये पुंछ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही या संघटनेचं नाव समोर आलं होतं. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT