Jammu-Kashmir sakal
देश

Jammu-Kashmir : मानवी गुप्तचर यंत्रणा बळकट करायला हवी;दहशतवादी हल्ल्यांबाबत तज्ज्ञांचे मत

जम्मू-काश्‍मीरमध्ये अलीकडे झालेले दहशतवादी हल्ले रोखण्यात राहिलेल्या त्रुटींमध्ये ‘प्रत्यक्ष मानवी गुप्तचर यंत्रणेकडून पुरेशी माहिती न मिळू शकणे’ हे एक प्रमुख कारण असल्याचे या हल्ल्यांच्या विश्‍लेषणातून लक्षात आल्याचे प्रतिपादन सुरक्षाविषयक तज्ज्ञांनी केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये अलीकडे झालेले दहशतवादी हल्ले रोखण्यात राहिलेल्या त्रुटींमध्ये ‘प्रत्यक्ष मानवी गुप्तचर यंत्रणेकडून पुरेशी माहिती न मिळू शकणे’ हे एक प्रमुख कारण असल्याचे या हल्ल्यांच्या विश्‍लेषणातून लक्षात आल्याचे प्रतिपादन सुरक्षाविषयक तज्ज्ञांनी केले आहे. जम्मू-काश्‍मीरमध्ये कथुआ आणि उत्तर काश्‍मीरसह काही ठिकाणी झालेले दहशतवादी हल्ले रोखण्यात आलेल्या अपयशामागील कारणांचे विश्‍लेषण करण्यात आले असता, केवळ तांत्रिक गुप्तमाहितीवर अवलंबून राहणे उपयुक्त ठरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

लष्कराचे लक्ष अन्यत्र वेधण्यासाठी दहशतवादी हे मुद्दाम दिशाभूल करणाऱ्या आॅनलाईन कारवाया करतात तर दुसरीकडे ते छुप्यापद्धतीने सर्वसामान्य नागरिकांत मिळूनमिसळून राहतात आणि हल्ला घडवून आणण्याबाबत पाकिस्तानातून आदेश येण्याची वाट पाहतात, असे या लष्कराच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर केवळ तंत्रज्ञानाच्या आधारे मिळणाऱ्या गुप्त माहितीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष मानवी गुप्तचर यंत्रणेकडून देखरेख ठेवण्यावर अधिक भर द्यायला हवा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दहशतवाद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाच्यानुसार दहशतवाद्यांनी त्यांच्या कारवायांच्या पद्धतीमध्ये बदल केले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष गुप्तचरांचे जाळे तयार करून त्यामाध्यमातून येथे पाळत ठेवणे आवश्‍यक असल्याचे विश्‍लेषणातून समोर आले आहे.

ठावठिकाणा शोधणे अवघड

दहशतवाद्यांकडून परस्परांशी संवाद साधण्यासाठी अल्ट्रा सेट उपकरणाचा वापर केला जात आहे, ज्याचा माग काढणे आणि त्यांच्या हालचाली टिपणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. उदाहरणार्थ २६ एप्रिल रोजी जम्मू-काश्‍मीरमध्ये हल्ला करणारे दहशतवादी हे गेल्या १८ महिन्यांपासून येथे लपून होते. अशा पद्धतीने छुपा दहशतवाद वाढत असून त्याला आळा घालण्यासाठी येथील नागरिकांनी चौकस असणे आणि प्रत्यक्ष मानवी गुप्तचर यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करणे आवश्‍यक असल्याचे येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT