Syed Ali Shah Geelani esakal
देश

Jammu Kashmir : दहशतवादाविरोधात SIA ची मोठी कारवाई; सरकारनं फुटीरतावादी नेत्याचं घर केलं सील

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात सातत्यानं कारवाई केली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात सातत्यानं कारवाई केली जात आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवादाविरोधात (Terrorist) सातत्यानं कारवाई केली जात आहे. स्थानिक प्रशासनानं बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीच्या (JeI) 122.89 कोटींच्या 19 मालमत्ता आणि माजी फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी (Syed Ali Shah Geelani) यांचं दोन मजली घर जप्त करण्यात आलंय.

टेरर फंडिंग प्रकरणाचा तपास करणार्‍या स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (SIA) शिफारसीनुसार, ही कारवाई करण्यात आली. गिलानीचं हे घर श्रीगढमधील बारजुला भागात आहे. एसआयएनं त्याच भागात आणखी एक निवासी घर जप्त केलं.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे घर जेईआयनं (JEI) 1990 च्या दशकात विकत घेतलं होतं आणि गिलानी (जेईआय) यांच्या नावावर नोंदणीकृत होतं. गिलानी 2000 दशकाच्या सुरुवातीला या घरात राहत होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांच्या मृत्यूनंतर, घराचा वापर जेईआयच्या अमीरनं केला.

SIA च्या प्रवक्त्यानं सांगितलं की, 'या कारवाईचा उद्देश फुटीरतावादी कारवायांसाठी निधीची उपलब्धता थांबवणं, तसंच भारताच्या सार्वभौमत्वासाठी देशविरोधी घटक आणि दहशतवादी नेटवर्कची संपूर्ण यंत्रणा उद्ध्वस्त करणं हा आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vikramgad Vidhansabha: विक्रमगडमध्ये तिरंगी लढतीत मतांचे विभाजन; कोण मारणार बाजी?

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Mumbai Indians, CSK, RCB सह सर्व संघांचं भविष्य ठरवणारं IPL Mega Auction; जाणून घेऊयात प्रत्येकाची गरज अन् रणनिती

Men's Stylish Outfits : मित्राच्या रिसेप्शनमध्ये आकर्षक आणि स्टायलिश दिसायचं आहे? या पारंपारिक लुकमध्ये चमका

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT