e sakla
देश

Jammu Kashmir: कंठस्नान घातलेला 'तो' दहशतवादी निवृत्त पाकिस्तानी जवान ! खोऱ्यात २० ते २५ दहशतवादी सक्रिय

जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि पूँछ भागात २० ते २५ दहशतवादी सक्रिय आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Jammu Kashmir Terrorist: जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि पूँछ भागात २० ते २५ दहशतवादी सक्रिय असून, यामध्ये सीमेपलीकडून आलेल्या पाकिस्तानच्या निवृत्त सैनिकांचाही सहभाग असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिली. राजौरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी द्विवेदी जम्मू येथे आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

राजौरीतील चकमकीत दोन दहशतवादी मारले गेल्याने दहशतवाद्यांच्या योजना आणि पाकिस्तान यांना मोठा धक्का बसला आहे. हे दहशतवादी डांगरी, कंडी आणि राजौरी परिसरात निष्पाप नागरिकांच्या हत्यांमध्ये सहभागी होते. त्यामुळे त्यांचा खात्मा करणे ही लष्कराच्या मोहिमेची प्राथमिकता होती, असेही द्विवेदी म्हणाले. राजौरी-पूँच महामार्गामुळेच काश्मीर हे देशाच्या अन्य भागाशी जोडले गेल्याने, तिथे मोठ्या प्रमाणात दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.

दहशतवाद्यांविरुद्ध झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी लष्करे तय्यबाचा मुख्य कमांडर कारी याच्यासह दोघांना मारले आहे. कारी हा अतिशय प्रशिक्षित होता; तसेच तो ‘स्नायपर’ही होता. तो अनेक वर्षांपासून या भागात सक्रिय होता. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला असून, दहशतवाद्यांची हत्या करण्यात आल्याने परिसरातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्यांचे मनसुबे धुळीला मिळाल्याचे द्विवेदी यांनी सांगितले. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पाच जवानांना जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी श्रद्धांजली वाहिली. पाच जवानांचे पार्थिव राजौरी जिल्ह्यातून जम्मूतील लष्कराच्या सामान्य रुग्णालयात आणण्यात आले.

अशा घटना मनोबल वाढवतात

बंगळूरमधील एम. व्ही. प्रांजल यांच्या वडीलांना दहशतवाद्यांना मारल्याची बातमी ऐकण्याची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र, आपल्या मुलाला वीरमरण आल्याची बातमी त्यांना ऐकावी लागल्याची आठवणही त्यांनी सांगितली. यातून जवानांची कर्तव्याप्रती असणारी निष्ठा दिसून येते. याच घटना जवानांना लढण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांचे मनोबल वाढवतात, असेही त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

प्रशिक्षित दहशतवादी

चकमकीत मारले गेलेले दोन दहशतवादी हे अत्यंत प्रशिक्षित होते, असेही द्विवेदी यांनी सांगितले. त्यांनी पाकिस्तान तसेच अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळेच त्यांचा खात्मा करण्यासाठी वेळ लागल्याचे ते म्हणाले. आमचे जवान साहसाने लढले. लान्स नायक संजय बिश्त यांनी तर त्यांना सात दिवसांत मारण्याचा निश्चय केला होता, असे ते म्हणाले.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आम्ही आमचे पाच जवान गमावले. मात्र, त्याचप्रमाणे दोन जहाल दहशतवाद्यांनाही कंठस्नान घातले. आमच्या जवानांनी स्वतःच्या वैयक्तिक सुरक्षेची पर्वा न करता देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे - लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT