HD Deve Gowda letter to PM Modi esakal
देश

Narendra Modi : माजी पंतप्रधानांनी केलं मोदींचं तोंडभरुन कौतुक; विरोधकांच्या एकजुटीला बसणार धक्का?

देशातील सर्व राज्यांतील विरोधी पक्ष भाजपविरोधात एकवटले आहेत, पण..

सकाळ डिजिटल टीम

देशातील सर्व राज्यांतील विरोधी पक्ष भाजपविरोधात एकवटले आहेत, पण..

HD Deve Gowda letter to PM Modi : पुढील वर्षी कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Karnataka Assembly Election) होणार आहेत. यापूर्वी PM मोदींना (Narendra Modi) एचडी देवेगौडा (HD Deve Gowda) यांनी एक पत्र लिहिलं. पत्रात देवेगौडांनी कर्नाटकातील महत्त्वाच्या प्रश्नांचा उल्लेख करून त्याची दखल घेण्याची विनंती केली होती.

माजी पंतप्रधानांच्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर मिळाल्यावर देवेगौडा यांनी त्यावर उघडपणे प्रतिक्रिया दिली. आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी पीएम मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. मात्र, देवेगौडांनी पंतप्रधानांचं कौतुक केल्याबद्दल वेगळाच राजकीय अर्थ काढला जात आहे.

केवळ कर्नाटकातच नाही, तर देशातील सर्व राज्यांतील विरोधी पक्ष भाजपविरोधात (BJP) एकवटले आहेत. असं असताना, कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी पंतप्रधानांबाबत केलेली चर्चा विरोधकांच्या ऐक्याला धक्का पोहोचू शकते. वास्तविक, जेडीएस प्रमुख एचडी देवेगौडा यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. पंतप्रधानांनी माझं म्हणणं गांभीर्यानं घेतलं आणि त्यावर नक्कीच विचार केला जाईल, असं सांगितलं.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी कर्नाटकातील हसन ग्रीन फील्ड विमानतळ प्रकल्प, कावेरी, कृष्णा, महादयी या आंतरराज्यीय नद्यांच्या पाण्याचं वाटप, ओबीसींच्या केंद्रीय यादीत वोक्कलिगाची उपजाती म्हणून कुंचितिगा यांचा समावेश आदी मुद्दे उपस्थित केले. याबाबत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आलं.

मोदींचं उत्तर मिळाल्यानंतर देवेगौडा म्हणाले, 'मी माझ्या निवेदनात नद्यांचं सिंचन, जातकुंचितीगा आणि इतर समस्यांचा उल्लेख केला आहे. पंतप्रधानांनी त्याची गांभीर्यानं दखल घेतली आहे. मोदींनी मी दिलेली सर्व कागदपत्रं पाहिली आहेत आणि याबाबत निश्चितपणे विचार करू, असं सांगितलंय'.

विरोधी पक्षांना धक्का बसणार?

देशभरात भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. जेडीएसनंही ही भूमिका बजावली आहे. अशा परिस्थितीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आणि नंतर लोकसभा निवडणुकीतही जेडीएस भाजपच्या विरोधात राहील, अशी काँग्रेससह सर्व पक्षांची अपेक्षा आहे. पण, जेडीएस प्रमुखांचं पीएम मोदींना पत्र आणि त्यानंतर पीएम मोदींची स्तुती हे वेगळेच संकेत देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT