झाशी न्यायालयानं (Jhansi Court) 8 विद्यार्थ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
झाशी न्यायालयानं (Jhansi Court) 8 विद्यार्थ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हे सर्व विद्यार्थी (Students) शासकीय पॉलिटेक्निकमध्ये (Government Polytechnic) शिकत असून त्यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांच्या वसतिगृहासमोरून जाणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता.
न्यायालयानं या मुलांना दंडही ठोठावला आहे. न्यायालयानं प्रत्येक दोषीला 30 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यातील निम्मी रक्कम पीडितेला दिली जाणार आहे. विशेष सरकारी वकील विजय कुमार कुशवाह (Adv Vijay Kumar Kushwaha) या प्रकरणाची सुरुवातीपासूनच चौकशी करत आहेत.
कुशवाह म्हणाले, आठही आरोपी या गुन्ह्यात दोषी आढळले आहेत. या सर्वांवर POCSO कायद्याच्या कलम 5/6, 9/10 सह 11 कलमांतर्गत कारवाई करण्यात आली. या बलात्काराच्या गुन्ह्यासाठी सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींमध्ये महोबाचा मुख्य आरोपी रोहित सैनी, भारत कुमार, संजय कुशवाह, धर्मेंद्र सेन, मोनू पर्या आणि झाशीचे मयंक शिवहरे, गोंडाचे शैलेंद्र नाथ पाठक व प्रयागराजचा विपिन तिवारी यांचा समावेश आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.