Building Collapse in Jharkhand  Esakal
देश

Building Collapse: झारखंडमध्ये मोठी दुर्घटना! 3 मजली इमारत कोसळ्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती

अंकिता खाणे (Ankita Khane)

सूरतसारखी मोठी दुर्घटना झारखंडमध्येही घडली आहे. तीन मजली इमारत कोसळल्याने खळबळ उडाली. या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एनडीआरएफचे पथक आणि जिल्हा अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून बचाव कार्य सुरू आहे. ही घटना झारखंडमधील देवघर येथील असल्याची माहिती आहे. इमारत कोसळताच आरडाओरडा झाला आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. या घटनेत एका लहान मुलासह तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे.

ढिगाऱ्याखालून ६ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक अजूनही अडकल्याची भीती आहे. देवघरचे डीसी विशाल सागर म्हणाले, येथे तीन मजली इमारत कोसळली आहे. दोघांना वाचवण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

एनडीआरएफचे पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची माहिती मिळत आहे. अशा परिस्थितीत बचावकार्य सुरू आहे. ते म्हणाले, प्राथमिक माहितीनुसार येथे काही बांधकाम सुरू होते. घर तेवढे मजबूत नसल्याने ते कोसळले असा संशय व्यक्त केला जात आहे. ते म्हणाले, या प्रकरणाची चौकशी केली जाईल पण सध्या लोकांचे प्राण वाचवण्याला प्राधान्य दिले जात आहे.

याआधी शनिवारी सुरतमध्ये पाच मजली इमारत कोसळल्याने खळबळ उडाली होती. ही घटना सचिन जीआयडीसी परिसरात घडली. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला तर एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले. हा अपघात एवढा भीषण होता की ढिगाऱ्याखालून लोकांचे आवाज येत होते.

या घटनेला 12 तासांहून अधिक काळ लोटला असून अजूनही बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी हजर आहे. सन 2017 मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. इमारतीमध्ये एकूण 30 फ्लॅट होते, त्यापैकी 5 मध्ये लोक राहत होते. घटना घडली त्यावेळी काही लोक कामावर गेले होते तर काही घरी झोपले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT