नवी दिल्ली- कोरोना विषाणूचा प्रभाव लोकांच्या शरीरावरच नाही, तर त्यांच्या मन आणि भावनांवरही पडताना दिसत आहे. कोरोना काळात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कुठे वडिलांना आपल्या मुलाच्या मृतदेहाला खांद्यावरुन घेऊन जावं लागत आहे, तर कुठे कुटुंबीय कोरोनात एकमेकांच्या मदतीलाही येत नाहीयेत. काही ठिकाणी तर कुटुंबातील सदस्यच साथ सोडताना पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या भीतीपुढे लोकाचं प्रेम कमी पडत आहे. झारखंडमध्ये एक अशीच सून्न करुन सोडणारी घटना समोर आली आहे. (jharkhand corona news two year son died in hospital)
एका दोन वर्षाच्या मुलाला आई-वडिलांनी हॉस्पिटलमध्ये सोडून पळ काढल्याचं समोर आलं आहे. बिट्टूला ताप आल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. येथे तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अशा स्थितीत पाषाण हृदयाच्या आई-वडिलांनी आपल्या चिमुकल्याला सोडून हॉस्पिटलमधून पळ काढला, त्यानंतर ते परत कधी आलेच नाहीत.
असे असले तरी बिट्टूचा अंत्यसंस्कार एका अनाथाप्रमाणे झाला नाही. रिम्स हॉस्पिटलमधील वार्ड बॉय रोहित बेदियाने त्या बाळाची जबाबदारी घेत, त्याचे अंत्यसंस्कार केले. दोन वर्षाच्या बिट्टूला त्याच्या आई-वडिलांनी 11 मे रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. रिम्समध्ये नोंदण्यात आलेल्या नावानुसार, बिट्टूच्या वडिलांचे नाव सिकंदर यादव आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, मुलाच्या गळ्यात काहीतरी अडकलं आहे आणि त्याला ताप असल्याची बतावणी आई-वडिलांनी केली होती.
डॉक्टरांनी तपास केल्यानंतर मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्याची स्थिती गंभीर असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण, त्यानंतर अचानक बिट्टूचे आई-वडील गायब झाले. मुलाचा मृत्यू 12 मे रोजी झाला. मुलाच्या मृत्यूनंतर आई-वडिलांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण काही उत्तर मिळालं नाही. दोन दिवस वाट पाहण्यात आली, पण शेवटी रिम्स कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. यावेळी वार्ड बॉय रंजीत बेदियाने माणूसकी दाखवत, चिमुकल्याचा मृतदेह आपल्या हातात घेऊन अॅम्बुलन्स ते स्मशान भूमित घेऊन गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.