नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत दिलेल्या निकालाविरोधात शरद पवारांच्या गटाना सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर आज सुनावणी पार पडली, यावेळी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशांवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. (jitendra awhad on sc hearing alleged on ajit pawar group they want to uproot sharad pawar from politics)
जनतेनं सकारात्मकतेनं पहावं
जितेंद्र आव्हाड म्हणाले, , "मला वाटतं की या देशातील लोकांनी ही गोष्ट सकारात्मकेतं घेतली पाहिजे जी सुप्रीम कोर्टानं म्हटलीए, "तुम्हाला या देशात काय घडवून आणायचं आहे? जे सीमेपलिकडं होतं ते करायचं आहे का? यासाठी त्यांनी थेट अजित पवारांच्या चिन्हाबाबतच्या घोटाळ्याकडं बोट दाखवत तुम्ही शरद पवारांकडून चिन्ह काढून घेतलं आहे. त्यांना कुठलाही पक्ष आणि चिन्हं मिळू नये अशी तुमची इच्छा आहे का? असं सूचकपणे म्हटलं आहे" (Marathi Tajya Batmya)
शरद पवारांना उद्ध्वस्त करायचंय
आव्हाड पुढे म्हणतात, मला याचा आनंद आहे की सुप्रीम कोर्टानं हे स्पष्ट केलं की त्यांना या देशातील लोकशाही मूल्यांचं रक्षण करायचं आहे. घटनेतील दहावं शेड्यूल स्पष्टपणे सांगतं की, वेगळे झाल्यानंतर जोपर्यंत तुम्ही राजकीय पक्षात विलीन होत नाही तोपर्यंत तुमची स्वतंत्र ओळख असू शकत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की, अजित पवारांच्या गटाला शरद पवारांना उद्ध्वस्त करायचं असून त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून उखडून टाकायचं आहे. (Latest Marathi News)
कारण त्यांना माहितीए की आपण सध्या ज्या झाडावर आहोत ते झाड शरद पवारांनी लावलेलं आहे. तसंच आत्ता शरद पवारांनी जे बी पेरलेलं आहे काही महिन्यातचं ते त्यांच्या झाडापेक्षा मोठं होणार आहे. म्हणूनच त्यांना शरद पवारांना बी सुद्ध पेरु द्यायचं नाहीए, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.