मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा PM मोदींकडं व्यक्त केली आहे. यावरुन आता राज्याच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर भाष्य केलं असून राज्यपालांची इच्छा म्हणजे दिल्लीश्वरांनी महाराष्ट्रातील जनतेला एक इशारा दिल्याचं त्यांनी म्हटलंय आहे. (Jiterndra Awhad Comment on Bhagat Singh Koshyari who wish to resign from his post of Governor)
आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रातील जनभावना लक्षात घेता त्यांनी खरंतर आधीच राजीनामा द्यायला हवा होता.
महाराष्ट्राचा अपमान करुन ते आता राजीनाम्याची इच्छा प्रकट करत आहेत म्हणजे दिल्लीश्वरांनी त्यांना महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून तुम्ही आमचं काही करु शकत नाही, दिल्ली पाहिजे तेच करु, दिल्ली करेल असा एक प्रकारे इशाराच महाराष्ट्रातील लोकांना देऊन टाकला आहे.
आता त्यांनी राजीनामा दिला काय आणि राहिला काय? महाराष्ट्राच्या लोकभावनेचा, महाराष्ट्रातील महापुरुषांचा जो अपमान झाला त्याची परतफेड तर होऊच शकत नाही.
राज्यापलांच्या विधानांमुळं सर्व वातावरण तापलेलं असताना भाजपनं कधी त्यांचा राजीनामा मागितला नाही. उलट आता वातावरण थंड झालेलं असताना ही बातमी समोर येते यावरुनच त्यांना हेच दाखवायचं आहे की, तुम्ही कितीही बोंबला. आम्ही काय वाट्टेल ते करु!
आंबेडकरांबद्दल बोलू, फुलेंबद्दल बोलू, शिवाजी महाराजांबद्दल बोलू, याचा आम्हाला काही पच्छाताप होत नाही. आम्हाला जे करायचं तेच आम्ही करु.
या माणसाच्या मनात किती वासना भरलेली होती, त्याला तेव्हाच हटवायला पाहिजे होतं पण यांना महाराष्ट्राच्या जनभावनेची किंमत कुठे आहे? अशा शब्दांत आव्हाड यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना यापूर्वी महापुरुषांबद्दल अनेकदा वादग्रस्त विधान केली आहेत. त्यामुळं त्यांना महाराष्ट्रातील जनतेचा रोष सहन करावा लागला होता. त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनंही देखील झाली होती.
इतकंच नव्हे बारा आमदारांच्या नियुक्तीवरुन तर त्यांच्याविरोधात कोर्टातही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पण केंद्र सरकारनं तरीही त्यांचा राजीनामा मागितला नव्हता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.