JMM-led coalition govt in Jharkhand wins trust vote Congress latest political news  
देश

Jharkhand Politics : झारखंडच्या वाघाने जिंकलं बहुमत.. चंपाई सोरेनच मुख्यमंत्री! ऑपरेशन लोटस ठरले अपयशी

Jharkhand Politics : अखेर चंपई सोरेन यांनी जिंकली बहुमत चाचणी!

रोहित कणसे

Jharkhand Politics Latest News : झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना मागील काही दिवसांपासून वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईंतर येथील सरकार अस्थिर झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र अखेर झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन हेच राहाणार आहे. कारण मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या नेतृत्वातील सरकारने आज झालेली बहुमत चाचणी जिंकली आहे. आज झालेल्या बहुमत चाचणी दरम्यान सोरेन यांच्या सरकारच्या बाजूने 47 मतं पडली असून 29 मतं विरोधात पडली आहेत.

झारखंडमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय गदारोळ सुरू आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकीय संकट उभं ठाकलं होतं. यानंतर चंपई सोरेन यांच्याकडे पक्षाने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर आज चंपई सोरेन यांना बहुमत चाचणीला सामोरे जावे लागले. या परीक्षेच सोरेन सरकार पास झालं आहे.

या फ्लोर टेस्टपूर्वी आमदार फुटण्याचा धोका लक्षात घेऊन सोरेन सरकारमधील आमदारांना हैदराबादमध्ये हालवण्यात आले होते. अखेर काल संध्याकाळी सर्व आमदार रांची येथे परतले होते. झारखंडमध्ये ऑपरेशन लोटसचा धोका देखील व्यक्त केला जात होता. मात्र यावेळी झारखंडमध्ये भाजपला यश मिळालेलं नाहीये.

संथ्याबळ किती होतं?

झारखंड विधानसभेत एकूण 81 जागा आहेत. त्यामध्ये बहुमतासाठी 41 सदस्यांचं संख्याबळ आवश्यक होतं. JMMच्या नेतृत्वाखालील युतीकडे 48 आमदाराचं पक्कं बहुमत होतं. यामध्ये JMM चे 29, काँग्रेसचे 17, RJD आणि CPI(ML) यांच्या प्रत्येकी एक सदस्यांचा समावेश आहे. यापैकी सरकारच्या बाजूने 47 मते पडली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy 2024-25: शम्स मुलानीच्या ६ विकेट्स! मुंबईकडे ३१७ धावांची आघाडी, ओडिसाला दिला फॉलो ऑन

Narendra Modi: लोकसभेचा धसका? तब्बल 49 मिनिटे भाषण, फक्त काँग्रेस, काँग्रेस अन् काँग्रेस! महायुतीसाठी पंतप्रधान अॅक्शन मोडमध्ये

Narendra Modi in Dhule: ''त्या दिवशी मी गप्प बसलो पण...'' मोदी लवकरच पूर्ण करणार फडणवीसांची 'ती' इच्छा, पंतप्रधानांचा धुळ्यात शब्द

Latest Maharashtra News Updates : जुन्नर पोलिसांनी साडेतीन लाखाच्या ३५ मोबाईलचा घेतला शोध

Solapur Assembly Election : तुतारी ते ट्रम्पेट : बार्शी वगळता 'या' 10 मतदारसंघात 'ट्रम्पेट'; कोणाची चालणार जादू?

SCROLL FOR NEXT