johnson vaccine 
देश

भारतात लहान मुलांसाठी येणार आणखी एक लस

सकाळ डिजिटल टीम

जॉन्सन अँड जॉन्सनने भारतात 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी लसीच्या चाचणीची परवानगी मागितली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करताना तज्ज्ञांनी यामध्ये मुलांसाठी धोक्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आता लहान मुलांसाठी आणखी एक लस लवकरच येण्याची शक्यता आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने भारतात 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी लसीच्या चाचणीची परवानगी मागितली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी नुकतंच मुलांसाठी तयार करण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीवर संशोधनाचा अहवाल पुढच्या महिन्यात येईल अशी माहिती दिली होती. त्यानंतर आता जॉन्सनने लशीच्या चाचणीसाठी मागितलेल्या परवानगीमुळे आशा निर्माण झाल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी म्हटलं होतं की, लवकरच लहान मुलांसाठीची लस उपलब्ध होऊ शकते. तसंच एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं होतं की, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे 2 ते 18 वर्षे वयोगटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातीच चाचणीचे निष्कर्ष सप्टेंबरपर्यंत समोर येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: एकनाथ शिंदेंनी शब्द खरा करून दाखवला, विधानसभेतील 'ते' भाषण व्हायरल

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

महायुती २०० पार, तर मविआची अनेक जागांवर हार, जाणून घ्या सर्व पक्षांच्या 'स्ट्राइक रेट'चा अहवाल

SCROLL FOR NEXT