cyberspace warfare sakal
देश

Cyberspace Warfare : सशस्त्र दलांसाठी प्रथमच संयुक्त सिद्धांत!

भारतीय सशस्त्र दलांनी स्वतःला नव्या आव्हानांसाठी सक्षम करण्यासाठी विविध पावले उचलली आहेत.

अक्षता पवार

सिक्कीम - भारतीय सशस्त्र दलांनी स्वतःला नव्या आव्हानांसाठी सक्षम करण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘सायबरस्पेस वॉरफेअर’ सज्जता. नुकतेच सशस्त्र दलांचे सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी प्रथमच ‘सायबरस्पेस जॉइंट डॉक्ट्रीन’ (संयुक्त सिद्धांत) जारी केले आहे. यामुळे सायबरस्पेसमधील युद्धासाठी भविष्यात तिन्ही दलांना समन्वय साधण्याकरिता हे संयुक्त सिद्धांत मोलाचे ठरणार आहेत.

अलीकडच्या काळात बदलत चाललेल्या युद्धनीतीनुसार सायबरस्पेसच्या क्षेत्रात पहिल्यांदाच जारी करण्यात आलेले हे जॉइंट डॉक्ट्रीन तिन्ही दलातील समन्वयासाठी निर्णायक पाऊल असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.

याबाबत बोलताना संरक्षण तज्ज्ञ कमोडोर श्रीकांत केसनूर (निवृत्त) यांनी सांगितले, ‘‘जॉइंट डॉक्ट्रीन तिन्ही दलांसाठी एक महत्त्वाचा पाया ठरणार आहे. सायबर युद्धाचा परिणाम देशाच्या विविध घटकांवरती होऊ शकतो. त्यामुळे याची गंभीरता लक्षात घेऊन सायबर डोमेनचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.

‘डॉक्ट्रीन’ हे एक विशिष्ट मार्गदर्शक घटकांचे, सिद्धांत व नियमांचा संच आहे. ज्यामुळे तिन्ही दलांना एखादी समस्या किंवा धोका टाळण्यासाठी एकाच पद्धतीने काम करण्याचे मार्गदर्शन मिळेल व समन्वय साधता येईल’’.

सायबर युद्ध म्हणजे काय?

एखाद्या व्यक्ती, समूह, संस्था किंवा देशाच्या विरुद्ध मुख्यतः इंटरनेट, संगणक किंवा संपर्क प्रणालीचा आक्रमक वापर. त्याचबरोबर माहिती नेटवर्कचा गैरवापर करत एखाद्या देशाच्या किंवा संरक्षण दलाच्या सेवांना ठप्प करण्याचा प्रयत्न. यालाच अलीकडे सायबर युद्ध किंवा सायबर वॉरफेअर असे म्हणले जाते.

सायबरस्पेस जॉइंट डॉक्ट्रीनबाबत

  • यामुळे सशस्त्र दलांच्या कमांडर्सना सायबरस्पेस ऑपरेशन्स करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल

  • सायबरस्पेसमधील सज्जतेमुळे देशाच्या राजकीय, अर्थव्यवस्था आणि इतर घटकांवर निर्णय घेणे तसेच स्वतःचा बचाव करण्याच्या क्षमतेवर परिणाम

  • हे जॉइंट डॉक्ट्रीन सायबरस्पेस ऑपरेशन्सच्या लष्करी पैलू समजून घेण्यावर भर देते

  • सायबरस्पेस युद्धामधील ऑपरेशन्स दरम्यान कमांडर, कर्मचारी आणि अभ्यासकांना, आवश्यक संसाधनांचा वापर, नियोजन आणि संचालन करण्यासाठी वैचारिक मार्गदर्शन प्रदान करते

  • याद्वारे सायबरस्पेसमधील ऑपरेशन्सबाबत जवानांमध्ये जागरूकता वाढेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT