high level meeting held in pmo on joshimath land subsidence action save joshimath sakal
देश

Joshimath crisis: जोशीमठबाबत मोठी अपडेट! सुरक्षित भागात...; रहिवाशांमध्ये घबराट

जोशीमठचा पहाडी भाग खचत असल्यानं या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

सकाळ डिजिटल टीम

जोशीमठ : उत्तराखंडच्या बद्रीनाथ या चार धामपैकी एक असलेल्या तीर्थस्थळाच्या जवळ असलेला जोशीमठ भाग हा सध्या संवेदनशील भाग बनला आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये अलकनंदा नदीच्या काठावर वसलेला हा भाग खचत चालला असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.

इथल्या अनेक घरांना तडे जात असल्यानं गेल्या काही काळापासून इथल्या अनेक वस्त्या असुरक्षित बनल्या आहेत. पण आता सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागातील काही घरांनाही तडे गेल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

यामुळं इथल्या रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Joshimath crisis Houses in safe areas also cracked Panic among residents)

माध्यमांतील वृत्तांनुसार, जोशीमठ इथल्या सेफ झोनमधील अनेक इमारतीत घरांना नुकतेच तडे गेल्याचं समोर आलं आहे. काही महिन्यांपूर्वी जोशीमठ चर्चेत आला होता कारण पर्वतीय भागातील या जमीनीचा भार वाढल्यानं ती खचत चालली असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला होता.

दरम्यान, ताज्या घटनेत इथल्या गांधीनगर वॉर्डमधील काही घरांना तडे गेल्याचं दिसून आलं आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो त्यामुळं यंदाच्या पावसामुळं हे तडे गेल्याचं काहींचं म्हणणं आहे. जोशीमठ भागाचं सुरक्षेच्या दृष्टीनं काही भाग करण्यात आले आहेत.

यामध्ये रेड झोनमधील घरांना मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याचं यापूर्वीच निदर्शनास आलं आहे. तर त्या तुलनेत अधिक सुरक्षित मानला गेलेल्या यलो झोनमधील घरांनाही आता तडे गेल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये जवळपास ५०० घरांना तडे गेले आहेत. त्यामुळं इथं राहणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित कॅम्पमध्ये नेण्यात आलं आहे.

नुकतेच तडे गेल्याचं सुनील, मनोहर बाग, रविग्राम शिंगधर, मारवाडी वॉर्ड्स या भागातील घरांना तडे गेले आहेत. स्थानिक रहिवासी असलेल्या विरेंद्र लाल तम्ता यांनी सांगितलं की, त्यांच्या घराला यापूर्वी तडे नव्हते ते आता दिसायाला लागले आहेत. त्यांच्या घरावर अधिकाऱ्यांनी यलो स्टिकर लावलं आहे. पावसाळ्यात इथल्या लोकांच्या काळजीत भर पडते. त्यामुळं इथल्या रहावाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

जवळच तीर्थक्षेत्र असल्यानं या भागात अनियंत्रितपणे मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामं झाली आहेत. याच बांधकामांमुळं जमीनीवरचा भार वाढून भुस्खलनाच्या धोक्याचा इशारा वैज्ञानिक आणि जिओलॉजिस्ट अनेक दशकांपासून देत होते, त्याची चिन्ह आता दिसायला लागली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT