JP Nadda said, Perpetrator never admits wrongdoing JP Nadda said, Perpetrator never admits wrongdoing
देश

जेपी नड्डा यांचा सोनिया, राहुल गांधींवर हल्ला; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

कोणताही गुन्हेगार आपण गुन्हा केला आहे हे स्वीकारत नाही. काँग्रेस आता एक पक्ष राहिला नसून तो भाऊ-बहिणीचा पक्ष झाला आहे. राहुल गांधी कधीही भारतीय भूमीवर बोलत नाहीत. भारताने त्यांचे ऐकले नाही तर ते लंडनला जाऊन बोलतात, असे जेपी नड्डा (JP Nadda) म्हणाले. नॅशनल हेराल्ड प्रकरणी नड्डा यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. (JP Nadda said, Perpetrator never admits wrongdoing)

जे जामिनावर बाहेर आहेत त्यांनी कोर्टात जाऊन बोलावे. गुन्हेगाराला शिक्षा होते. ते २०-२० वर्ष शिक्षा भोगतात. परंतु, ते म्हणतात की आम्हाला गोवण्यात आले आहे. हा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. न्यायालय याची सखोल चौकशी करीत आहे. तुमच्यावर आरोपपत्र दाखल झाले तर तुम्ही कोर्टात का जात नाही, असे भोपाळमधील कार्यक्रमात जेपी नड्डा (JP Nadda) यांनी काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल करीत म्हटले.

गांधी कुटुंबातील दोन सदस्यांना समन्स बजावल्यानंतर राजकीय तापमानात वाढ झाली आहे. काँग्रेस (Congress) नेते रणदीप सुरजेवाला यांनी जोरदार हल्ला चढवत म्हटले की सरकार घाबरले आहे. हुकूमशहा घाबरला आहे आणि हुकूमशहा आपल्या चुका लपवण्यासाठी कुरघोडी करीत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.

सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्या ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. त्याचवेळी राहुल गांधी यांनाही २ जून रोजी बोलावण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, ते परदेशात आहेत. त्यामुळे राहुल गांधींनी हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे.

काँग्रेस कायदेशीर वादात अडकू शकते

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीची नोटीस मिळाल्यावर काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. अभिषेक मनू सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारच्या आठ वर्षातील ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा काँग्रेस हायकमांडला अशाप्रकारे घेरण्यात आले आहे. यामुळे काँग्रेस कायदेशीर वादात अडकू शकते. परंतु, त्याचा राजकीय फायदाही होऊ शकतो, असे मानले जात आहे. या निमित्ताने काँग्रेसचे कार्यकर्ते काहीसे सक्रिय होऊ शकतात आणि पक्षही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Chh. Sambhajinagar : चेकपोस्टवर पाच कोटींची रक्कम जप्त....परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात पोलिसांची दक्षता

SCROLL FOR NEXT