jp nadda seeks votes for corona vaccine in himachal pradesh elections pm modi bjp  Sakal
देश

BJP: मतांसाठी भाजपकडून कोरोनाचा लसीचं राजकारण; नड्डा म्हणाले, मोदींनी लस बनवून तुमचं...

सकाळ डिजिटल टीम

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरू झाली आहे. राज्यात 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना बंडखोरांचा धोका आहे. यादरम्यान भाजपकडून कोरोना लसीकरणाचा उपयोग राजकीय कारणासाठी केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हिमाचल दौऱ्यावर असताना कोरोना काळात नागरिकांना देण्यात आलेल्या लसींच्या बदल्यात मत मागीतल्याचा प्रकार समोर आला आहे.

जीपी नड्डा यांनी आज बिलासपूर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी जेपी नड्डा यांनी जाहीर सभेत सांगितले की, पंतप्रधान मोदींनी 9 महिन्यांत देशात दोन कोरोना लसी तयार केल्या आणि तुम्हा सर्वांना दुहेरी डोससह बूस्टर डोस दिला. मोदींनी तुम्हा सर्वांचे रक्षण केले. ज्या पक्षाने तुमचे रक्षण केले त्याचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

हिमाचलला एम्स मिळेल असं कधी वाटलं होतं?

नड्डा आपल्या भाषणात म्हणाले की, हिमाचलला एम्स (AIIMS) मिळेल असे कधी वाटले होते? 24 कोटीवाल्या यूपीलाही एम्स आणि 60 लाख हिमाचललाही एम्स मिळाले .हा डबल इंजिन सरकारचा फायदा आहे. संबोधनानंतर नड्डा यांनी ट्विट केले की, ऋषीमुनींची पवित्र भूमी हिमाचल नेहमीच विकासापासून वंचित राहिली आहे, तिची सांस्कृतिक उन्नती आणि जलद विकास डबल इंजिन सरकारमध्ये शक्य आहे. तुम्ही सर्वांनी भाजपला साथ द्यावी आणि पवित्र कार्यात सहभागी व्हा असे ते म्हणाले आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. 68 जागांच्या या राज्यात भाजपला 21 जागांवर बंडखोरांचा धोका दिसत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनीही 6 जागांवर बंडखोरी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

Winter Health Tips : हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्याला वैतागला आहात, औषधांपेक्षा हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे

Healthy Food : मुलांसाठी पोषक आहेत हे लाडू, घरीच बनवा अन् नैसर्गिकरित्या मुलांची उंची वाढवा

Cherry Blossom Festival : चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल पहायला जपान,चीनला कशाला जायचं? भारतात आहेत ही खास ठिकाणं

Latest Maharashtra News Updates live : अभिनेते, आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा महायुतीच्या उमेदवारांसाठी सोलापुरात 'रोड शो'; नागरिकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT