Dhananjaya Chandrachud  sakal
देश

Chandrachud: राम मंदिराच्या निकालाबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांची महत्वाची टिप्पणी; म्हणाले, संघर्षाचा इतिहास...

राम मंदिराची उभारणी आता जवळपास पूर्ण होत आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राम मंदिराची उभारणी आता जवळपास पूर्ण होत आली आहे. पण याबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालबाबत सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सोमवारी महत्वाची टिप्पणी केली. त्यांनी म्हटलं की, अयोध्या प्रकरणात सर्वसंमतीनं असा निर्णय घेण्यात आला होता की, निर्णय कोणी लिहिला त्याचा उल्लेख होणार नाही. पीटीआयशी बोलताना सरन्यायाधीशांनी ही माहिती दिली आहे. (Judges in Ayodhya case unanimously decided there will be no authorship ascribed to judgement CJI Chandrachud)

चंद्रचूड म्हणाले की, "राम मंदिराच्या संघर्षाचा दीर्घ इतिहास आणि त्याचे विविध दृष्टीकोण लक्षात घेता सुप्रीम कोर्टानं अयोध्या प्रकरणात एकमतानं निकाल सुनावण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सर्वसंमतीनं असा निर्णय घेण्यात आला होता की, प्रत्यक्ष निर्णय कोणी लिहिला त्याचा उल्लेख केला जाणार नाही. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सुप्रीम कोर्टानं अयोध्येच्या राम मंदिराबाबत अंतिम निकाल दिला होता. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील विशेष खंडपीठानं (न्या. शरद बोबडे, न्या. डीवाय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण, न्या. अब्दुल नजीर) सर्वसंमतीनं निर्णय सुनावला होता. (Latest Marathi News)

असा झाला होता निर्णय

निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं सरकारला तीन महिन्यांच्या आतमध्ये मंदिर निर्माणासाठी ट्रस्ट बनवण्याचा, मंदिर उभारण्याचं नियोजन तसेच निधी उभारण्याचे निर्देश दिले होते. तसेच निकालात असंही म्हटलं होतं की, २.७७ एकर संपूर्ण वादग्रस्त भूमी हिंदूंना मिळेल. जमिनीचा कब्जा कायद्याच्या आधीन राहून संपत्तीच्या सरकारी व्यवस्थापकाकडं राहिलं. मुस्लिमांना पर्याय म्हणून इतर जागी पाच एकर जमीन देण्याचा निर्णय देण्यात आला होता.

यानंतर ५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिराचं भूमीपूजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक साधूंची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT