Justice Chitta Ranjan Das Esakal
देश

Justice Chitta Ranjan Das: आज मला खरं सांगायला हवं... निवृत्तीच्या दिवशी RSS बद्दल न्यायमूर्ती असे का म्हणाले?

RSS: दरम्यान, याआधी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असलेले रंजन गोगोई यांनाही निवृत्तीनंतर भाजपने राज्यसभेचे खासदारपद दिले होते.

आशुतोष मसगौंडे

सोमवारी कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झालेले न्यायमूर्ती चित्त रंजन दास यांनी त्यांच्या निरोपाच्या भाषणात सांगितले की, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत आणि जर बोलावले गेले तर “संघटनेत परत जाण्यास तयार आहे”.

माझा व्यक्तिमत्व विकास, धैर्य आणि देशभक्ती जागवण्याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाते, असे कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चित्त रंजन दाश यांनी नुकतेच म्हटले आहे.

न्यायमूर्तींनी सांगितले की, ते लहानपणापासूनच आरएसएसशी संबंधित आहे. न्यायाधीश म्हणाले, "आज मला खरं सांगायला हवं. या संस्थेचे मी खूप ऋणी आहे. मी लहानपणापासून तारुण्यापर्यंत तिथे जात होतो. तिथे गेल्यामुळे मी धाडसी आणि प्रामाणिक राहायला, इतरांचा विचार करायला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जिथे काम कराता तिथे देशभक्तीच्या भावनेने काम करायला शिकलो. मी कबूल करतो की, मी RSS चा सदस्य होतो आणि आहे."

यावेळी, न्यायमूर्ती दास यांनी असेही सांगितले की, न्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला आरएसएसपासून दूर केले आणि सर्व खटले नि:पक्षपातीपणे हाताळले.

न्यायमूर्ती दास यांनी संघाशी असलेल्या त्यांच्या संबंधाबद्दल तपशीलवार सांगितले ते म्हणाले, "न्यायिक सेवेत रुजू झाल्यानंतर, मी जवळपास 37 वर्षे संघटनेपासून (RSS) अंतर ठेवले. मी माझ्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी कधीही माझ्या संघटनेच्या सदस्यत्वाचा वापर केला नाही. कारण हे आमच्या तत्त्वाच्या विरुद्ध आहे."

1962 मध्ये ओडिशात सोनपूरमध्ये जन्मलेले न्यायमूर्ती दास 1986 मध्ये वकील झाले. 1999 मध्ये, त्यांनी ओडिशा न्यायिक सेवांमध्ये प्रवेश केला आणि राज्याच्या विविध भागांमध्ये अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची ओरिसा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार (प्रशासन) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

10 ऑक्टोबर 2009 रोजी त्यांना ओरिसा उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली आणि 20 जून 2022 रोजी त्यांची कलकत्ता उच्च न्यायालयात नियुक्ती झाली होती.

न्यायमूर्तींचा भाजपकडे ओढा?

न्यायमूर्ती दास यांच्या आधी आणखी एका न्यायमूर्तींनी भाजपशी बांधिलकी व्यक्त केली होती. नुकतेच कोलकाता उच्च न्यायालयाचे आणखी एक न्यायाधीश न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पदाचा राजीनामा दिला होता. ते पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील तामलुक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूकही लढवत आहेत.हे न्यायाधीश सेवेत असतानाच भाजपचे सदस्य झाले आणि नंतर राजीनामा दिला.

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष टीएमसी त्यांच्या सर्व निर्णयांवर प्रश्न उपस्थित करत आहे.

दरम्यान, याआधी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असलेले रंजन गोगोई यांनाही निवृत्तीनंतर भाजपने राज्यसभेचे खासदारपद दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT