नवी दिल्ली - देशभरात प्रसिद्ध झालेल्या एसडीएम अधिकारी ज्योती मौर्य आणि होमगार्ड कमांडंट मनीष दुबे प्रकरणी प्रशासनाने दुबे कडक कारवाई केली. प्रशासनाकडून मनीष दुबे यांना निलंबित केले आहे. याबाबत डीजी होमगार्ड बी.के. मौर्य यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या शिफारशींसह अहवाल पाठवल्यानंतर ही कारवाई झाली.
चौकशी अहवालात डीजी होमगार्ड यांनी कमांडंट मनीष यांना निलंबित करण्याची शिफारस केली होती. शिवाय गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानुसार मनीष दुबे यांना निलंबित करण्यात आले आहे.
मनीष दुबे यांनी आपल्या कृतीतून विभागाची प्रतिमा मलीन केली. तसेच त्यांनी त्याच्या संपर्कात आलेल्या महिलांचे शोषण केले, असे तपासात समोर आले आहे. 2021 मध्ये मनीषने अलीगंजमधील आर्य समाज मंदिरात लखनौमधील एका महिलेशी लग्न केले होते. त्यानंतर काही दिवसांनी हुंड्यापोटी ८० लाख रुपये मिळावेत म्हणून तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केल्याचे अहवालात म्हटल्याचं समजत.
मनीष यांच्या पत्नीने डीआयजींना दिलेल्या जबाबात याला दुजोरा दिला आहे. तर मनीष यांच्यावर अमरोहा येथे पोस्टिंग दरम्यान एका महिला होमगार्डवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. महिला होमगार्डने डीआयजीसमोर याला दुजोरा दिला. तसेच अत्याचाराविरोधात तक्रार केल्याने मनीष यांनी तिला नोकरीवरून काढून टाकल्याचही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर डीजी होमगार्डकडे केलेल्या तक्रारीनंतर तिला पुन्हा सेवेत घेण्यात आले.
एसडीएम ज्योती मौर्य आणि त्यांचे पती आलोक मौर्य यांच्यातील वादाचे प्रकरण सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहे. आलोक मौर्य यांनी ज्योती मौर्य यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून पती आणि ज्योती या दोघांमधील अंतर लक्षणीय वाढले. आलोक मौर्य यांनी मनीष दुबे हेच पत्नीसोबतच्या वादाचे खरे कारण सांगितले आहे.
ज्योती-आलोक एकत्र येणार?
एसडीएम पत्नीचा प्रियकर होमगार्ड कमांडंट मनीष दुबे याच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर ज्योती आणि आलोक तडजोड करतील का? मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलोक मौर्य म्हणतात की, त्यांनी कुटुंब विभक्त होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आपली पत्नी ज्योती ही मनिष दुबे यांच्यामुळेच विभक्त होण्यास प्रयत्नशील होती. मात्र मुलांसाठी आपण एकत्र येण्यास तयार असल्याचही आलोक यांनी सांगितलं.
2010 ते 2020 या काळात ज्योती मौर्य आणि आलोक यांचा संसार सुरळीत सुरू होता. पण अचानक मनीष दुबेंच्या एन्ट्रीमुळे त्यांच्या कुटुंबात फूट पडली आहे. आलोक मौर्य यांनी पत्नी ज्योतीसोबतच्या वादासाठी मनीष दुबे यांना जबाबदार धरले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.